अभिनेत्री आलिया भट्टच्या आईचा ‘गौप्यस्फोट’ ; ‘प्रेग्‍नेंट झाल्याचं माहित नव्हतं, त्यावेळी चुकून हे काम केलं’

मुंबई : पोलीसनामा ऑनालाईन – बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्टची आई सोनी राजदान यांनी ट्विटद्वारे एक खुलासा केला आहे. त्यांनी १९९३ मध्ये आलेला चित्रपट ‘गुमराह’ची आठवण करून ट्विट केले. हा चित्रपट महेश भट्टने डायरेक्ट केला होता. या चित्रपटामध्ये आलियाची आई सोनी राजदान यांनी काम केले होते आणि त्यावेळी ते प्रेग्नेंट होत्या. या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत श्रीदेवी आणि संजय दत्त होते.

image.png

सोनी राजदान यांनी ‘गुमराह’ चा फोटो शेअर करुन लिहले की, ‘हा माझा आवडता चित्रपट आहे. या चित्रपटामधील माझ्या भूमिकेचे खूप कौतुक करण्यात आले होते. श्रीदेवीसोबत काम करुन मला खूप छान वाटले. तिच्यासोबतच्या खूप आठवणी आहेत. त्यावेळी मी आलियाची आई होणार होते मला माहित नव्हते की, मी प्रेग्नेंट आहे. या चित्रपटादरम्यान मला खूप सिगारेट ओढायला लागली होती. ‘

image.png

‘गुमराह’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाला होता. आजही या चित्रपटाची पसंती प्रेक्षकांमधून कमी झालेली दिसत नाही. सोनी राजदान आणि महेश भट्ट यांचे अनेक वर्ष अफेअर होते. यानंतर त्यांनी २० एप्रिल १९८६ मध्ये लग्न केले. सोनी राजदानच्या दुसऱ्या मुलीचे नाव शाहीन भट्ट आहे. सोनी राजदान चित्रपट ‘नो फादर्स इन कश्मीर’ मध्ये दिसून आल्या होती.

image.png

या चित्रपटामध्ये त्यांच्या अभिनयाचे खूप कौतुक करण्यात आले होते. मागील वर्षी प्रदर्शित झालेल्या चित्रपट ‘राजी’ मध्ये सोनी यांनी आलिया भट्टच्या आईची भूमिका साकारली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. सध्या आलिया भट्ट ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटासाठी खूपच चर्चेमध्ये आहे. काही दिवसांपुर्वीच आलिया आणि रणबीर कपूर यांनी या चित्रपटाची शूटिंग पुर्ण केली आहे.

image.png

पहिल्यांदाच चित्रपटामध्ये आलिया आणि रणबीर एकत्र चित्रपटात दिसून येणार आहे. यामध्ये सुप्रसिद्ध अभिनेता अमिताभ बच्चन आणि मौनी रॉय मुख्य भूमिकेत दिसून येणार आहे. हा चित्रपट अयान मुखर्जी यांनी डायरेक्ट केला आहे. हा एक सुपनॅचरल चित्रपट आहे. या व्यतिरिक्त आलिया संजय लिला भन्साळी यांचा ‘इंशाअल्लाह’ चित्रपटात दिसून येणार आहे. यामध्ये पहिल्यांदा सलमान आणि आलिया एकत्र काम करताना दिसणार आहे.

‘ही’ पथ्ये पाळून थायरॉईड अगदी ‘कंट्रोल’मध्ये आणा

‘कोथिंबीर’चं सेवन डोळयांसाठी अत्यंत फायदेमंद, जाणून घ्या

दातांच्या समस्येवर करा  ‘हे’ घरगुती उपाय

बीट खाल्याचे ‘हे’ चमत्कारिक फायदे ; ‘खुंटते कॅन्सरग्रस्त कोशिकांची वृध्दी’, जाणून घ्या

लहान मुलांना दुधीदात येत असताना होणाऱ्या त्रासावर करा ‘हे’ ५ उपाय

 

Loading...
You might also like