मराठीत काम करण्यासाठी ‘ही’ बॉलिवूड अभिनेत्री शिकते आहे मराठी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री सोहा अली खान हिला मराठीमध्ये काम करण्याची इच्छा आहे अशी माहिती समोर आली आहे. खुद्द सोहानेच याबाबत  खुलासा केल्याचे समजत आहे. सोहाने मराठीत काम करण्यास इच्छुक असल्याचं नुकतंच बोलून दाखवलं आहे. तिला तशा काही ऑफर्स आल्याचंही तिने सांगतिले आहे.

एका मुलाखतीत बोलताना सोहाने तिला मराठीत काम करायचं असल्याचं सांगितलं आहे. सोहा म्हणाली की, “प्रादेशिक सिनेमांमध्ये काम करताना अनेकदा भाषेच्या अडचणी येतात. त्यामुळे मलाही भाषेच्या अडचणीमुळे प्रादेशिक सिनेमांमध्ये काम करता येत नाही. मला मराठी सिनेमांच्या काही ऑफर्सही आल्या आहेत. परंतु मला भाषा येत नसल्यामुळे मी नाविलाजाने त्या नाकारल्या.” असा खुलासा खुद्द सोहा अली खान हिने केला आहे. दरम्यान सोहा अली खान लवकरच मराठी शिकणार आहे अशीही माहिती समोर आली आहे. त्यामुळे जर सोहा अली खान आता मराठीत  काम करताना दिसली तर आश्चर्य वाटायला नको.

अभिनेत्री आणि नवाब सैफ अली खान याची बहिण सोहा अली खानने अनेक हिंदी सिनेमात काम केले आहे. इतकेच नाही तर सोहाने बंगाली सिनेमातही आपल्या अभिनायची झलक दाखवली आहे.