Photos : ‘या’ मराठी अभिनेत्रीचं प्रचंड Bold फोटोशुट ! सोशलवर एकच ‘खळबळ’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  प्रसिद्ध मॉडेल, अ‍ॅक्ट्रेस प्राजक्ता शिंदे (Prajakta Shinde) सोशल मीडियावर कायमच अ‍ॅक्टीव असते. प्राजक्ता सोशलवर कायमच हॉट किंवा बोल्ड अंदाजात समोर येत असते. आपल्या बोल्ड लुक आणि हॉटनेससाठी ती सोशल मीडियावर फेमस आहे. तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशलवर अनेकदा व्हायरल झाले आहेत. पुन्हा एकदा आपल्या हॉटनेसनं प्राजक्तानं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. प्राजक्ता लवकरच मराठी सिनेमातून डेब्यू करणार आहे.

प्राजक्तानं तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केल आहे यात ती प्रचंड हॉट दिसत आहे. कारण अनेक फोटोत तिनं बोल्ड बिकिनी घातली आहे. काही फोटोत तर ती भलत्याच हॉट आउटफिटमध्ये दिसत आहे.

चाहत्यांना भुरळ घालणारे हे फोटो सोशलवर प्रचंड व्हायरल झाले आहेत. प्राजक्ताचा हा अवतार चाहत्यांनाही खूप आवडला आहे. अनेकांनी तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. चाहत्यांनी तिच्या ब्युटी आणि हॉटनेसचं कौतुक केलं आहे.

प्राजक्तानं अद्याप सिनेमात डेब्यू केलेला नाही तरीही आताच तिची चर्चा मराठीतील लोकप्रिय अभिनेत्रींसोबत होताना दिसत आहे. आपल्या लुकमुळं ती सोशलवर जोरदार चर्चेत आहे.

प्राजक्ताच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच ती ईमेल फीमेल (Email Female) या मराठी सिनेमात काम करताना दिसणार आहे. हा तिचा डेब्यू सिनेमा आहे. याचा ट्रेलरही 20 मार्च 2020 रोजी रिलीज करण्यात आला आहे.