‘मी हस्तमैथुन करतो हे वडिलांना कळालं होतं’, ‘या’ अभिनेत्याचा धक्‍कादायक खुलासा

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाईन – सूत्र संचलाक, एका कार्यक्रमातील स्पर्धक, लेखक, गायक, अशा विविध क्षेत्रात सक्रीय असणारा आणि वेगळे सिनेमे करणारा अभिनेता म्हणजे आयुष्मान खुराना. वयाच्या 35 व्या वर्षी आयुष्मान हा एक यशस्वी अभिनेता आहे. अगदी राष्ट्रीय पुरस्कारापर्यंत आयुष्मानने मजल मारली आहे. लैंगिक शिक्षणाबाबतही आयुष्मानने ठाम मत मांडलं आहे. त्याच्या पालकांशी लैंगिक शिक्षणाविषयी झालेल्या संवादाबाबत आयुष्मानने खुलासा केला आहे. मी हस्तमैथुन करत असल्याचं वडिलांना कळालं होतं असं आयुष्मानने सांगितलंय.

View this post on Instagram

Oops I dropped the mic!

A post shared by Ayushmann Khurrana (@ayushmannk) on

पालकांशी कधी लैंगिक शिक्षणाच्या मुद्द्याावर तुझं बोलणं झालं आहे का असा प्रश्न विचारल्यानंतर आयुष्मान म्हणाला की, “वडिलांशी एकदा या विषयावर संवाद  झाला होता. मी हस्तमैथुन करतो हे वडिलांना कळालं होतं. हे सारं काही सामान्य आहे असं त्यांनी म्हटलं होतं. या वयात असं होतं.” असा खुलासा आयुष्मानने केला.

लैंगिक शिक्षणाच्या मुद्द्यावरअधिक बोलताना आयुष्मान म्हणाला की, “चित्रपटांच्या माध्यमातून  आपण कितीही म्हटलं की, लैंगिक शिक्षण मिळणं गरजेचं आहे, परंतु ही बाब तितकीच खरी आहे की, आई-वडिलांशी या मुद्द्यावर भाष्य करताना काहीसा संकोच वाटतो. किमान आपल्या देशात तरी अशीच परिस्थिती आहे.

View this post on Instagram

With my #Dreamgirl @tahirakashyap ❤️

A post shared by Ayushmann Khurrana (@ayushmannk) on

 

आरोग्यविषयक वृत्त –

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like