Coronavirus : प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री ‘डेबी मजार’ला ‘कोरोना’ची लागण ! पोस्ट शेअर करत म्हणाली…

पोलीसनामा ऑनलाइन टीम – अनेक  हॉलिवूड कलाकार खतरनाक कोरोना व्हायरसच्या कचाट्यात सापडले आहेत. अलीकडेच माहिती समोर आली आहे की, हॉलिवूडची प्रसिद्ध अ‍ॅक्ट्रेस डेबी मजार (Debi Mazar) हिलादेखील कोरोनाची लागण झाली आहे. डेबीनं इंस्टावरून याबाबत माहिती दिली आहे. डेबीनं इंस्टावरून एक पोस्ट शेअर करत याबाबत सांगितलं आहे.

हॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस डेबी मजार कोरोना पॉझिटीव आढळली आहे. रविवारी(दि 22 मार्च 2020) डेबीनं जाहीर केलं की, ती कोरोना बाधित आहे. डेबीनं हे सांगितल्यानंतर तिच्या चाहत्यांना तर धक्काच बसला आहे. डेबीला कोरोनाची लागण होऊन 5 दिवस झाले आहेत. डेबीनं तिच्या इंस्टावरून लांबलचक पोस्ट लिहिली आहे.

डेबी आपल्या पोसल्टमध्ये म्हणते, “मी कोरोना पॉझिटीव आहे. परंतु मी ठिक आहे. एका महिन्यापूर्वी माझ्या कुटुंबाला ताप आणि डोकेदुखी होती. गळाही खराब होता. परंतु सारं काही ठिक झालं. 15 मार्च 2020 रोजी मला पुन्हा एकदा तिच लक्षण जाणवली. यावेळी तीव्रता जास्त होती. मला 102.4 एवढा ताप होता. मला वाटलं की, फ्लू किंवा कोरोना असेल. मी माझ्या जीवनातील सर्वात वाईट काळातून जात आहे. एक दिवस मला चांगलं वाटत दुसऱ्या दिवशी पुन्हा त्रास होतो. आज माझ्या फुफ्फुसात दुखत आहे.” असंही तिनं सांगितलं.