आपल्या आगामी चित्रपटाबद्दल जान्हवी कपूरचा मोठा ‘खुलासा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – ‘धडक’ या चित्रपटातून बॉलिवूड चित्रपटसृष्टीत पदार्पण करणारी व प्रसिद्ध अभिनेत्री श्री देवी आणि बोनी कपूर यांची मुलगी जान्हवी कपूरने कमी काळात आपले नाव कमावले आहे. जान्हवी कपूर सध्या ‘रूहीआफ्जा’ चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन हार्दीक मेहता करत आहे.

सगळ्यात खास बातमी ही आहे की ‘रूहीआफ्जा’ या चित्रपटात जान्हवी कपूर डबल रोल करणार आहे. त्याचबरोबर ती रुही आणि अफसाना ही दोन भूमिका साकारणार आहे. या चित्रपटासाठी जान्हवी खूप मेहनत घेत आहे. त्याचबरोबर ती चित्रपटाबाबतीत थोडी अंधविश्वासी आहे.

जान्हवीने सांगितले की, ‘चित्रपटाची शुटिंग खूप चांगल्या प्रकारे चालु आहे. मला तुम्ही अंधविश्वासु म्हणा किंवा जुन्या विचाराची म्हणा पण मला असे वाटते की, मी चित्रपटाबद्दल जास्त बोलले तर त्याला वाईट नजर लागेल. यामुळे मी चित्रपटाबद्दल जास्त बोलणार नाही. चित्रपटाचा हिस्सा बनून यामध्ये सहभागी होणाऱ्या लोकांमुळे मी स्वतःला भाग्यशाली समजते.’

हा चित्रपट हॉरर असणार आहे. चित्रपटात वरुण शर्मा मुख्य भूमिकेत दिसणार असून या चित्रपटामध्ये जान्हवी डबल रोल करणार आहे. तसेच या चित्रपटामध्ये राजकुमार राव सुद्धा असणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग उत्तराखंडच्या रुडकी येथे करण्यात येणार आहे. हा चित्रपट २० मार्च २०२० ला प्रदर्शित होणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त- 

वजन कमी करताना येणारा अशक्तपणा धोकादायक 

स्मरणशक्ती वाढविण्यासाठी करा ‘हे’ उपाय 

मणक्यातील वेदना हे असू शकते पॅरालिसिसचेही लक्षण 

गाईच्या तुपात कॅन्सरशी लढण्याची ताकद, संशोधकांचा दावा