Arvind Joshi Death : शरमन जोशीचे वडिल प्रसिद्ध अभिनेते अरविंद जोशी यांचं निधन !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड अ‍ॅक्टर शरमन जोशी (Sharman Joshi) याचे वडिल प्रसिद्ध अभिनेते अरविंद जोशी (Arvind Joshi) यांच आज (दि 29 जानेवारी) निधन झालं आहे. नानावटी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. एका इंग्रजी वृ्त्तानुसार, ट्रेड अ‍ॅनलिस्ट कोमल नाहटानं याबाबत माहिती दिली आहे. त्यांचं निधन कशानं झालं याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.

अभिनेते परेश रावल यांनी अरविंद यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला आहे. हे इंडियन थिएटरचं मोठं नुकसान असल्याचंही ते म्हणाले आहेत. शरमन जोशी आणि त्याच्या कुटुंबासोबत माझ्या संवेदना आहेत असंही ते म्हणाले आहेत.