Tandav Controversy : ‘मीदेखील हिंदूच, पण…’, स्वरा भास्करच्या ‘त्या’ ट्विटमुळं नवं तांडव होण्याची शक्यता !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  बॉलिवूड ॲक्टर सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि ॲक्ट्रेस डिंपल कपाडिया (Dimple Kapadia) यांची तांडव (Tandav) या ॲमेझॉन प्राईमवरील वेब सीरिजमुळं नवा वाद सुरू झाला आहे. भगवान शंकराचा अपमान करत हिंदुंच्या भावना दुखावल्याचा आरोप या सीरिजवर होत आहे. सध्या ही सीरिज बॅन करण्याची मागणी सुरू आहे. सीरिजचे मेकर्स आणि कलाकारांविरोधात एफआयआर दाखल झाली आहे. वादानंतर मेकर्सनी माफीही मागितली आहे. तरीही यावरील वाद सुरूच आहे. बॉलिवूड ॲक्ट्रेस स्वरा भास्कर हिनं आता या वादात उडी घेतली आहे. स्वराची पोस्ट सध्या जोरदार चर्चेत आहे.

स्वरानं तिच्या ट्विटरवरून एक ट्विट केलं आहे. आपल्या ट्विटमध्ये स्वरा म्हणते, मी देखील हिंदू आहे. परंतु यातील कोणत्याच दृश्यामुळं नाराज झाले नाहीये. तांडव बॅन करण्याची ही मागणी कशासाठी ? असंही ती म्हणाली आहे.

स्वराचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी यावर कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी हे ट्विट शेअर देखील केलं आहे. या ट्विटनंतर आता स्वरा प्रचंड ट्रोल होत आहे. आता तिच्या ट्विटमुळं नव्या वादाला तोंड फुटणार का असा सवाल केला जात आहे.

दरम्यान तांडव या सीरिजच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. लखनऊच्या हजरतगंज पोलीस ठाण्यानंतर आता ग्रेटर नोएडाच्या राबूपुरा ठाण्यात वेब सीरिजचे डायेरक्टर अली अब्बास जफर (Ali Abbas Zafar), प्रोड्युसर, अॅक्टर सैफ अली खान, सुनील ग्रोवर, डिंपल कपाडिया यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप आहे.