मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – दिल दोस्ती दुनियादारी फेम अभिनेत्री सखी गोखले आणि अभिनेता सुव्रत जोशी यांना लग्नाचे वेध लागले असून गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या लग्नाची धामधून सुरु झाली आहे. आज (गुरूवार दि 11 एप्रिल) हे दोघे लग्नबंधनात अडकत आहेत. दोघेही खूप आनंदात आहे.
नुकतेच सखी आणि सुव्रत यांच्या मेहंदीचे फोटो व्हायरल झाले होते. त्यानंतर सखी आणि सुव्रत हे दोघे लग्न करणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या. त्यानंतर अखेर सखीने मात्र आपण सुव्रत सोबत लग्न करणार असल्याचं सांगितलं. एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना तिने ही कबुली दिली होती.
काही दिवसांपूर्वीच सखीने काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. बॅचरल स्पिनटर्स पार्टीचा हे फोटो होते. त्यानंतर आता सुव्रतने तर चक्क मेहंदीचेच फोटो त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीला शेअर केल्याचे दिसत आहेत. त्यांच्या अनेक मित्र मंडळींनीही त्यांच्या मेहंदी समारंभातील फोटो शेअर केले आहेत. काही फोटोंमध्ये तर सखीला नवरी आणि सुव्रतला नवरा असंही म्हटलं होतं. त्यामुळं समोर येणाऱ्या अनेक फोटोंवरून ते दोघे काही दिवसांतच लग्न करणार असल्याचा अंदाज होता. अखेर हा अंदाज खरा ठरत आहेत. दोघेही विवाहबंधनात अडकत आहेत. अभिनेत्री पर्णा पेठे हीदेखील या लग्नासाठी रवाना झाली आहे. पर्णा ही वरपक्षाकडून आहे.
दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेच्या सेटवर काम करताना सखी आणि सुव्रत एकमेकांना भेटले. ओळखीचं रुपांतर मैत्रीत आणि नंतर त्याचं प्रेमात रुपांतर झालं. अमर फोटो स्टुडिओ या नाटकातही दोघे एकत्र दिसले आहेत. अखेर आता हे दोघे एकमेकांचे आयुष्याचे जोडीदार बनणार आहेत.