कपिल शर्माच्या घरी येणार आणखी एक नवा पाहुणा ! व्हिडिओत कैद झालं पत्नीचं बेबी बंप

पोलीसनामा ऑनलाइन – कॉमेडियन कपिल शर्मा (Kapil Sharma) च्या चाहत्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. कपिल शर्मा पुन्हा एकदा बाबा होणार आहे. त्याच्या घरी लवकरच एक नवीन पाहुणा येणार आहे. त्याची पत्नी गिनी चतरथ (Ginni Chatrath) आता दुसऱ्यांदा प्रेग्नंट आहे.

कपिल आणि गिनी यांनी 2019 मध्ये पहिल्या मुलीला जन्म दिला आहे. अनायरा शर्मा (Anayra Sharma) असं तिचं नाव आहे. अनायरा आता 11 महिन्यांची आहे. गिनी जानेवारी 2021 मध्ये आपल्या दुसऱ्या मुलाला जन्म देणार आहे. म्हणजे नवीन वर्षात कपिल शर्माच्या घरी आणखी एक नवीन पाहुणा येणार आहे.

गिनीनं तिच्या प्रेग्नंसीचे 6 महिने पूर्ण केले आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, कपिलची आईदेखील सध्या मुंबईतच फॅमिली सोबत आहे.

एका व्हिडिओतील गिनीच्या स्क्रीनशॉटमध्ये तिचं बेबी बंप स्पष्ट दिसत आहे. हा स्क्रीनशॉट समोर आल्यानंतर ही बातमी सगळीकडे पसरली आहे. करवा चौथच्या निमित्तानं भारती सिंह इंस्टावर लाईव्ह होती. यावेळी गिनी लाईव्हमध्ये स्पॉट झाली आहे. असं असलं तरीही अद्याप कपिल आणि गिनी यांनी यावर काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

याआधीही कपिलनं दिवाळीचे काही फोटो शेअर केले होते. यात गिनी खुर्चीच्या मागे उभी राहत बेबी बंप लपवताना दिसली होती.

You might also like