Video : ‘हॉटनेस’ टेस्टसाठी प्रोडयूसरला करायचं होतं अभिनेत्री मल्‍लिका शेरावतच्या पोटावर ‘असं’ काही

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची बोल्ड आणि सेक्सी म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री मल्लिका शेरावत खूप काळानंतर आता स्क्रिनवर वापसी करत आहे पण यावेळी ती मोठ्या पदड्यावर नसून वेबद्वारे वापसी करणार आहे. ‘बू सबकी फटेगी’ या नावाने एकता कपूरची ही वेब सीरीज ऑल्ट बालाजीवर सुरु होणार आहे. मल्लिका आजकाल याच वेबसीरीजच्या प्रमोशनसाठी व्यस्त आहे. नुकतीच कपिल शर्मा शोमध्ये मल्लिका पोहचली होती. मलायकासोबत जेव्हा तिच्या हॉटनेसचा विषय निघाला तेव्हा तिने असे उत्तर दिले सगळे हसायला लागले.

आपल्या अंदाजामध्ये कपिल मल्लिकाला म्हणाला की, अनेक अफवा अशा होत्या की, ज्या पेपरमध्ये तुझा फोटो असेल त्या पेपरमध्ये लोक पोळ्या गुंडाळत होते. हे खरे आहे का ? या प्रश्नावर मल्लिका खूप हसली आणि म्हणाली की, हो हे खरे आहे.

या गप्पांमध्ये मल्लिकाने एक किस्सा सांगितला. ती म्हणाली की, माझात हॉटनेस किती आहे हे पाहण्यासाठी एका प्रोड्यूसरला माझ्या पोटावर अंड्राफ्राय होताना पहायचे होते पण या प्रोड्यूसरच्या इच्छांवर पाणी पडले कारण मी हा सीन करण्यासाठी नकार दिला होता.

कपिलच्या शोमध्ये एकता कपूरच्या भितीचा खुलासा झाला. अर्चना पूरन सिंहने सांगितले की, एकता प्लाइटमध्ये प्रवास करण्यास घाबरते. एकदा मी एकतासोबत प्रवास करत होती. प्रवासादरम्यान एकताने १५ ते २० मिनिटे माझा हाथ पकडला होता. यावर तुषारसुद्धा जोरात हसला आणि म्हणाला की, हो हे खरे आहे. एकता कपूर फ्लाइटमध्ये प्रवास करण्यासाठी खूप घाबरते.

https://www.instagram.com/p/Bwqwi4DF_BN/

 

यकृताच्या समस्येसाठी ‘कच्ची पपई’ ठरेल रामबाण उपाय

‘किवी’ हे फळ आरोग्यासाठी फायदेशीर

शांत झोपेसाठी रात्री करा ही ‘आसने’

लोकसभा निवडणूकीत वंचितला डावलणाऱ्या कॉंग्रेसची विधानसभेसाठी ३ जूलैला ‘बोलणी’

उत्तरप्रदेशमध्ये योगी सरकारच्या निर्णयावर बरसल्या मायावती