‘त्यांनी’ संकेत दिलेत, आता संपूर्ण महाराष्ट्र भाजपमय केल्याशिवाय राहणार नाही : देवेंद्र फडणवीस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – संपूर्ण महाराष्ट्र भाजपमय केल्याशिवाय राहणार नाही असे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगत नव्या सरकारला इशारा दिला. आम्ही धोक्याने सत्तेपासून बाहेर राहिलो, मात्र आम्हाला फार काळ कोणी रोखू शकणार नाही. येत्या काळात आपलेच सरकार येणार असा विश्वास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. तसेच, ईश्‍वराचा संकेत आहे की संपूर्ण महाराष्ट्र हा भाजपामय करा. त्यामुळे आता संपूर्ण महाराष्ट्र भाजपमय केल्याशिवाय राहणार असे ही फडणवीस म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी हर्षवर्धन पाटील, विजयसिंह मोहिते पाटील, बाळा भेगडे, सुभाष देशमुख, राहुल कुल, राम सातपुते यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी फडणवीस म्हणाले की, हर्षवर्धन पाटील आणि माझा देखील ॲक्सिडेंट झाला आहे. पण काळजी करण्याचे कारण नाही, फार काळ आपल्याला कोणी मागे ठेऊ शकत नाही. आत्ता आपण धोक्याने बाहेर राहिलो. परंतू तुम्ही पुणे जिल्ह्यापुरते नेते नाहीत. पश्‍चिम व उत्तर महाराष्ट्रात आमच्यासोबत तुम्हाला मैदानात उतरावे लागेल. कारण तुमच्यामध्ये तेवढी क्षमता आहे.

राज्याच्या 40 वर्षांच्या इतिहासात एकही पक्ष 70 टक्के जागा जिंकला नाही त्या आपण जिंकल्या असा विश्वास व्यक्त करत फडणवीस म्हणाले की, जनतेने आपल्याला निवडून दिले आहे. आपल्याला दिलेल्या जागांपैकी 70 टक्के जागा आपण जिंकलो आहोत. महाराष्ट्राच्या 40 वर्षांच्या इतिहासात एकही पक्ष 70 टक्के जागा जिंकलेला नाही. पण भाजपाने 70 टक्के जागा जिंकल्या. पण दुर्दैवाने ज्यांना आपण सोबत घेतले होते, त्यांनी जनादेशाशी विश्वासघात केला.

Visit : Policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like