अबब.. संपूर्ण संघ चार धावांत बाद ; कुठे घडला हा प्रकार जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – शेवटच्या चेंडूपर्यंत रंगणारे सामने आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बघता असतो. आयपीयलमध्ये तर अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत रंगणारा सामना टाय देखील होऊन तो सुपर ओव्हर पर्यंत जातो. मात्र भारतातील स्थानिक क्रिकेटमध्ये एक विचित्र घटना घडली आहे. केरळमधील एका स्थानिक सामन्यात हा प्रकार घडला आहे.

या सामन्यात  संपूर्ण संघ चार धावांवर बाद  झाला. केरळच्या मालापुरम जिल्ह्यात वायनाड आणि कासारगौड संघात हा सामना खेळवला जात होता.

पेरिनथमाला येथील मैदानावर हा सामना खेळवण्यात येत होता. या सामन्यात  कासारगौड संघ अवघ्या चार धावांवर सर्वबाद झाला. या सामन्यात संघातले दहाही खेळाडू त्रिफळाचित झाले. अकरापैकी एकही खेळाडू एक धाव सुद्धा काढू शकला नाही. या चार धावा देखील विरोधी संघाने अतिरिक्त दिल्यामुळे त्यांना मिळाल्या.

प्रत्युत्तरात पाच धावांचे लक्ष घेऊन मैदानात उतरलेल्या वायनाड संघाने हे आव्हान पहिल्याच षटकात पूर्ण केले. या सामन्याची स्थानिक क्रीडा वर्तुळात मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहे.