उद्योजक अनिर्बन सरकार यांना ‘डॉक्टरेट’ ! नेपाळच्या गांधी पीस फौंडेशन आंतरराष्ट्रीय संस्थेकडून सन्मानित

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक, डेक्कन वॉटर ट्रीटमेंटचे एमडी तसेच डेक्कन एव्ही मीडिया सर्व्हिसेसचे संचालक अनिर्बन सत्यरंजन सरकार यांना नेपाळ मधील गांधी पीस फौंडेशन या आंतरराष्ट्रीय संस्थेतर्फे ‘गांधी तत्वज्ञान, राजकीय परिस्थिती, शांतता आणि मानवता’ या विषयासाठी सन्माननीय डॉक्टरेट ही पदवी बहाल करण्यात आली.

अनिर्बन सरकार हे पुण्यातील नामवंत उद्योजक आहेत. ‘वॉटर ट्रीटमेंट’ या विषयातील जाणकार म्हणूनही त्यांचा नावलौकिक आहे. डेक्कन एव्ही मीडिया सर्व्हिसेसचे संचालक म्हणूनही ते काम पाहात आहेत. भारतातील सामाजिक स्थिती, शैक्षणिक धोरण तसेच राजकीय परिस्थिती या विषयांवर त्यांनी विविध सेमिनारमध्ये सहभाग घेऊन आपले विचार मांडले आहेत.

सरकार यांनी ‘गांधी तत्वज्ञान, राजकीय परिस्थिती, शांतता आणि मानवता’ या विषयावर सादर केलेला प्रबंध आणि त्यांनी विविध क्षेत्रात केलेले कार्य पाहून नेपाळमधील गांधी पीस फौंडेशन या आंतरराष्ट्रीय संस्थेने त्यांना ही सन्माननीय डॉक्टरेट पदवी बहाल केली आहे. आंतरराष्ट्रीय संस्थेकडून बहाल करण्यात आलेल्या या सन्माननीय डॉक्टरेट पदवीबद्दल अनिर्बन सरकार यांचे उद्योजक जगतात सर्वत्र कौतुक होत आहे.