अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठ आणि उद्योग विभाग यांच्यात सामंजस्य करार; नवउद्योजकांना होणार फायदा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठ, न्यूयॉर्क यांच्या सहयोगाने उद्योजकांसाठी मुंबईत जागतिक दर्जाचे बिझनेस इन्क्युबेटर स्थापन केले जाणार आहे. राज्य सरकारच्या उद्योग विभाग आणि अमेरिकेच्या कॉर्नेल विद्यापीठ यांच्यात एक सामंजस्य करार झाला आहे. याचा फायदा राज्यातील नवउद्योजकांना होणार आहे.

उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली याचा स्वाक्षरी सोहळा आयोजित केला होता. कॉर्नेल विद्यापीठ, अमेरिका यांनी सामंजस्य करारावर सह्या केल्या. महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागाचे विकास आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांच्या 2 वर्षांच्या प्रयत्नांना यश आले आहे.

इंटरनॅशनल बिझनेस इन्क्युबेटर अत्याधुनिक सुविधा असलेल्या कॉर्नेल महा-60 कार्यक्रमाचे रिलायन्स आयटी पार्क, नवी मुंबई येथे स्थापन करण्याचे मान्य केले असून तसा करार केलाय. उद्योगमंत्री सुभाष देसाई, डॉ. हर्षदीप कांबळे आणि पॉल क्राउस, व्हाईस प्रोव्होस्ट, कॉर्नेल विद्यापीठ यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केलीय.

यावेळी राज्यमंत्री अदिती तटकरे, प्रधान सचिव (उद्योग) वेणुगोपाल रेड्डी, महाराष्ट्र उद्योग विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनबलगण, कॉर्नेल महा-60चे प्रोफेसर लन, कॉर्नेलचे प्रकल्प व्यवस्थापक डेव्हिन बिगॉनेस आणि मिस्टर जॉन कॅलेलिल एक्सईडी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, सिंगापूर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी सुभाष देसाई म्हणाले, उद्योजकांसाठी जागतिक दर्जाची सुविधा असलेले बिझिनेस इनक्यूबेटर सेंटर नवी मुंबईत स्थापित करणे हे महाराष्ट्र सरकारचे खूप मोठे आणि नाविन्यपूर्ण पाऊल आहे. राज्यात नवीन तांत्रिक, उच्च कुशल मनुष्यबळ व नाविन्यपूर्ण कल्पना असलेले तरुण उद्योजक आहेत.

या बिझनेस अ‍ॅक्सिलेटर महिलांसह विविध विभागातील समावेश असलेल्या तरुणांसह राज्यातील प्रारंभिक विकासाला उत्तेजन देण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. या व्यवसायाचा वेग देणारी यंत्रणा बनविली आहे. डॉ. हर्षदिप कांबळे हे या कामासाठी कौतुकास पात्र आहेत.

यावेळी डॉ. हर्षदीप कांबळे म्हणाले, ’कॉर्नेल हे जगप्रसिध्द विद्यापीठ प्रथम अमेरिकेबाहेर अशा प्रकारचे जागतिक दर्जाचे बिझनेस अ‍ॅक्सिलेटर स्थापन करीत आहे. अशा प्रकारचा भारतातील हा पहिलाच कोर्स असून कॉर्नेल महा-60 हा कार्यक्रम याअंतर्गत चालणार आहे. तो सुमारे वर्षभर निवडक 60 उद्योजकांना प्रशिक्षण देईल. तसेच त्यांना विद्यापीठाकडून पदविका प्रमाणपत्र मिळेल.

व्हाईस प्रोव्होस्ट पॉल यांनी महाराष्ट्र शासन आणि कॉर्नेल विद्यापीठ यांच्यातील सामंजस्य करार हा स्वाक्षरी सोहळा ऐतिहासिक आहे, असे असल्याचे म्हटले आहे. तर, कॉर्नेल महा-60 फॅकल्टी डायरेक्टर प्रो. लन यांनी बर्‍याच वर्षांनी या मास्टर सर्व्हिस करारावर स्वाक्षरी होत असल्याबाबत आनंद झाल्याचे सांगितले. कॉर्नेल महा-60 कार्यक्रमाबाबत दूरदृष्टी आणि सतत पाठपुरावा केल्याबद्दल डॉ. हर्षदिप कंबळे यांचे आभार मानले आहेत.