‘कृषी पदवी’ प्रवेश आता ‘नव्या’ नियमांनुसारच ; जाणून घ्या नवे नियम

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमांमध्ये केवळ सीईटीच्या गुणांवर प्रवेश मिळत होता. आता त्यात कृषी अभ्यासक्रमांचीही भर पडली आहे. कृषी पदवी अभ्यासक्रमांना या वर्षीपासून केवळ सीईटीतील गुणांवर प्रवेश दिले जाणार आहेत. याबाबतची माहिती महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे संचालक हरिहर कौसडीकर यांनी दिली आहे .

कृषी पदवी प्रवेशासाठी बदललेले नियम –

कृषी विद्यापिठांशी संलग्न महाविद्यालयांमध्ये कृषी पदवी अभ्यासक्रमांना या वर्षीपासून केवळ सीईटीतील गुणांवर प्रवेश दिले जाणार आहेत. बारावीचे गुण ग्राह्य धरले जाणार नाहीत
कृषी पदवीमध्ये प्रवेशासाठी बारावी (विज्ञान) च्या आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ४० टक्के गुण व खुल्या प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना किमान ५० टक्के गुण अनिवार्य आहेत.

बारावीचे गुण ग्राह्य धरण्यात येणार नसले तरी शेतजमीन (१२ टक्के), बारावीतील व्यावसायिक विषय (१० टक्के), राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना, क्रीडा स्पर्धा, वादविवाद, निबंध, वकृत्व या राज्यस्तरीय स्पर्धांचे (२ टक्के) गुण विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणेच मिळणार आहेत. पुढील वर्षीपासून हे गुणही न देण्याबाबत विचार सुरू आहे.

प्रवेश प्रक्रिया –

कृषी पदवी प्रवेश प्रक्रियेंतर्गत चार ऑनलाईन फेऱ्या घेण्यात येतील. प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना या www.mahacet.org या साईटवर रेजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे. जूनच्या तिसऱ्या आठवड्यानंतर या www.maha-agriadmission.in साईटवर फॉर्म भरायचे आहेत.

राज्यातील अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र यांसारख्या अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी सीईटी अनिवार्य होती. गेल्या वर्षी प्रथमच कृषी पदवीचा यात समावेश करण्यात आला. मात्र पहिलेच वर्ष असल्या कारणाने बारावीचे ३० टक्के व सीईटीचे ७० टक्के गुण ग्राह्य धरण्यात आले होते.

यावर्षी मात्र यात बदल करण्यात आला आहे. केंद्र व राज्य सरकारने कृषी अभ्यासक्रमाला व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणून घोषित केल्याने कृषी विद्यापीठातील सर्व अभ्यासक्रमांच्या यंदा सीईटीच्या गुणांवरच प्रवेश दिला जाईल.

आरोग्य विषयक वृत्त – 

‘या’ आयुवेर्दिक उपायांमुळे तणाव होईल दूर

अंघोळ करताना तुम्ही ‘या’ चूका तर करत नाही ना ?

‘Sexsomnia’ने ग्रासित लोक झोपेमध्येही ‘हे’ करतात

गरोदरपणा नंतरचा लठ्ठपणा नको ? मग ‘हे’ पाणी प्या

You might also like