‘नाराज’ वडेट्टीवारांच्या बंगल्यात ‘प्रवेशबंदी’ ? दारं-खिडक्या बंद करून मंत्री ‘नॉट रिचेबल’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – ओबीसी खात्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या बंगल्यात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. वडेट्टीवार यांच्या बी 1 या सरकारी बंगल्याची दारं खिडक्या बंद आहेत. दुय्यम खाती मिळाल्याने वडेट्टीवार नाराज असून ते नॉट रिचेबल आहेत. आज झालेल्या विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनालाही त्यांनी दांडी मारली होती.

एकीकडे महाविकासआघाडीने आज विशेष अधिवेशन घेतलं. तर काही मंत्री नाराज असल्याने नॉट रिचेबल आहेत. त्यापैकी एक आणि सर्वात महत्त्वाचे मंत्री काँग्रेसचे विजय वडेट्टीवार. गेल्या काही दिवसांपासून ते नॉट रिचेबल आहेत. त्यांचा कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसोबतही काही संपर्क झालेला नाही.

विजय वडेट्टीवार यांच्या बी 1 बंगल्यात असलेल्या कार्यालयात एरवी मोठी गर्दी असते. पंरतु आता मात्र तेथे कोणीही दिसत नाही. त्यांच्या बंगल्यांची दारं खिडक्याही बंद करण्यात आली आहेत. त्यांच्या स्वीय सहाय्यकांनादेखील कोणत्याही सूचना देण्यास मनाई करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून विजय वडेट्टीवार हे दूरध्वनीवरूनही उपलब्ध झालेले नाहीत.

विजय वडेट्टीवार यांना देण्यात आलेल्या खात्यांना स्वतंत्र दर्जा नाही. या खात्यांना स्वतंत्र सचिवदेखील नाही. त्यामुळे चंद्रपूरमध्ये काँग्रेससाठी मोठं काम करून, आमदारांची संख्या वाढवूनही त्यांना दुय्यम खाती मिळाल्याने ते नाराज आहेत. त्यांचे कार्यकर्तेही नाराज आहे. त्यांनी अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली आहे. ही नाराजी दूर करण्यासाठी आता काँग्रेस वरिष्ठांकडून काय प्रयत्न होतात याची चाचपणी सुरू आहे. महाराष्ट्राचे काँग्रेस प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे हे दुपारनंतर मुंबईत येण्याची शक्यता आहे. खर्गे वडेट्टीवारांची भेट घेऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/