…म्हणून ‘भाई’ PM नरेंद्र मोदींना लिहणार ‘लेटर’

मुुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात प्लॅस्टिक बंदीची पूर्णपणे अंमलबजावणी व्हावी, यासाठी पर्यावरण मंत्री रामदास कदम हे प्रयत्नशील आहेत. त्यासाठी त्यांनी आता दुधाच्या पिशव्यांवरही संक्रांत आणली आहे. एवढे करुन ते थांबणार नाही तर ते प्लॅस्टिक बंदी पूर्णपणे यशस्वी व्हावी, यासाठी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून आवाहन करणार आहेत. त्यात ते गुजरातमध्ये प्लॅस्टिक बंदी करावी अशी मागणी करणार आहे.

महाराष्ट्रात प्लॅस्टिक बंदी केल्याने राज्यातील सर्व प्लॅस्टिक कारखाने बंद करण्यात आले. हजारो छोटे उद्योग बंद पडून त्यात काम करणारे लाखो गोरगरीब कामगार देशोधडीला लागले. पण, राज्यात प्लॅस्टिकचा पुरवठा काही थांबला नाही. सुरुवातीला काही काळ या प्लॅस्टिक बंदीची जोरदार अंमलबजावणी झाली. अधिकाऱ्यांनी नेहमीप्रमाणे मोठा उत्साह दाखवत प्लॅस्टिक सापडलेल्या व्यापाऱ्यांवर प्रत्येकी ५ हजार रुपये दंडही ठोठावला. त्यानंतर काही दिवसांनी सर्व ‘सेट’ झाल्यावर प्लॅस्टिक विरोधातील कारवाया थंडावल्या. सर्वत्र प्लॅस्टिक सर्रास मिळू लागले. लोकसभा निवडणुकीत अधिकारी व कर्मचारी गुंतवल्याने प्लॅस्टिक बंदीची अंमलबजावणी जवळजवळ थांबली आहे.

त्यामुळे महाराष्ट्रातील प्लॅस्टिक बंदीमुळे येथील उद्योगधंदे बंद पडले तरी त्याचा फायदा गुजरातला झाला. गुजरातमध्ये प्लॅस्टिकला बंदी नसल्याने तेथून महाराष्ट्रात सर्व प्लॅस्टिक येते. राज्यात अधिकृत व अनाधिकृतपणे वापरल्या जाणाऱ्या प्लॅस्टिकपैकी ८० टक्के प्लॅस्टिक हे गुजरातमधून येत आहे. जर गुजरात सरकारने त्यांच्या राज्यात प्लॅस्टिक बंदी लागू केली तर, महाराष्ट्रात येणारे प्लॅस्टिक बंद होईल व राज्यातील प्लॅस्टिक बंदी यशस्वी होईल, असा रामदास कदम यांचा होरा आहे. त्यामुळे आता रामदास कदम गुजरात राज्याने प्लॅस्टिक बंदी करावी, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून आवाहन करणार आहेत.
प्लॅस्टिक बंदीवरील प्रश्नांना उत्तर देताना कदम यांनी स्वत: विधानसभेत ही माहिती दिली.

दिवसभर थकणाऱ्या हातांनादेखील रिलॅक्स करणे गरजेचे

हिंमत असेल तर आगामी विधानसभा निवडणूक बॅलेट पेपरवर घ्यावी’

पोट आणि कंबर अधिक आकर्षक करण्यासाठी करा’स्ट्रेचिंग’

शरीराला पाण्याची गरज का असते ? जाणून घ्या ही ५ कारणे

महिलांनो, बाळंतपणानंतर पुन्हा मिळवता येऊ शकतो कमनीय बांधा

विना परवाना शेकडो खड्डे खोदल्याने नगर परिषदेचा समोर आला गलथान कारभार

You might also like