आदित्य ठाकरेंनी दिल्लीत घेतली राहुल गांधींची भेट, चर्चेला उधाण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – पर्यटन मंत्री आणि शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. राहुल आणि आदित्य यांच्या या भेटीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. असे असले तरी ही भेट सदिच्छा भेट असल्याचं सांगितलं जात आहे. राज्यात काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी असं मिळून महाविकासआघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर आदित्य आणि राहुल यांची ही पहिलीच भेट आहे त्यामुळे सर्वांचच या भेटीकडे लक्ष लागलं आहे.

आदित्य ठाकरे गेल्या दोन दिवसांपासून दिल्ली दौऱ्यावर आहेत. रहुल आणि आदित्य यांच्या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा होताना दिसत आहे. महाराष्टात आज सर्वत्र मकर संक्रांत साजरी होताना दिसत आहे. शिवसेना आणि काँग्रेसमध्ये गोडवा निर्माण करण्यासाठी आदित्य ठाकरेंनी राहुल गांधींची भेट घेतली असल्याचे बोलले जात आहे. राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

राहुल गांधी आणि आदित्य ठाकरे यांच्यात आघाडी सरकारची धोरणं आणि आघाडी सरकार चालवताना येत असणाऱ्या अडचणींवर चर्चा होण्याची शक्यता आहे. याशिवाय दिल्लीत सध्या विधानसभा निवडणुकींचं वातावरण आहे. त्यामुळे या निवडणुकांबाबतही दोघांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. इतकेच नाही तर आदित्य ठाकरे आता पर्यटन मंत्री आहेत. त्यामुळे खात्याशी संबंधित काही गोष्टींवरही ते चर्चा करू शकतात.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like