#WorldCup2019 : पहिल्याच सामन्यात इंग्लंडच्या कर्णधारानं नोंदवला ‘हा’ विक्रम

लंडन : वृत्तसंस्था – विश्वकप २०१९ स्पर्धेला काल सुरुवात झाली. काल झालेल्या सलामीच्या सामन्यात यजमान इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेचा १०४ धावांनी पराभव करून स्पर्धेची सुरुवात विजयाने केली. यजमानांनी पहिल्याच सामन्यात साऊथ आफ्रिकेसमोर ३१२ धावांचे आव्हान त्यानं पेलवले नाही आणि इंग्लंडनं १०४ धावांनी हा सामना जिंकला.

या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार इऑन मॉर्गन याने नवीन विक्रम केला आहे. त्याने विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होण्याआधी घरच्या मैदानावर झालेल्या स्पर्धेत, पाकिस्तानविरुद्ध सामन्यात मॉर्गनने पॉल कॉलिंगवूडचा १९७ सामन्यांचा विक्रम मोडला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना मॉर्गनचा २०० वा सामना ठरला आहे. मॉर्गनच्या पाठीमागे पॉल कॉलिंगवूड (१९७ सामने), जेम्स अँडरसन (१९४ सामने), अॅलेक स्टुअर्ट (१७० सामने) आणि इयान बेल (१६१ सामने) हे खेळाडू आहेत.

इंग्लंडकडून खेळण्याच्या आधी त्याने आर्यलंडकडून २३ एकदिवसीय सामने खेळले आहेत. यात त्याने ७४४ धावा केल्या होत्या . त्याने आतापर्यंत इंग्लंडकडून २०० सामने खेळले आहेत. आणि दोन्ही देशांची बेरीज करता एकूण २२३ सामने खेळले आहेत. कालच्या सामन्यात केलेल्या ५७ धावांच्या खेळीबरोबरच त्याने एकदिवसीय सामन्यात आपले ७ हजार रन देखील पूर्ण केले.