EPF Account सोबत नवीन बँक खाते लिंक करणे खुपच सोपे, फॉलो करा ‘ही’ सोपी स्टेप बाय स्टेप प्रोसेस
नवी दिल्ली : EPF Account | अनेकदा असे होते की, सबस्क्रायबर PF अकाऊंटसोबत लिंक असलेले बँक अकाऊंट बंद करतात आणि नवीन बँक खाते PF अकाऊंटसोबत लिंक करण्यास विसरून जातात. बँक अकाऊंटची माहिती अपडेट नसल्याने खातेधारक आपल्या पीएफ अकाऊंटमधून पैसे काढू शकत (EPF Account) नाहीत. अशावेळी तुम्हाला नवीन बँक खात्याची माहिती पीएफ अकाऊंटसोबत अपडेट करणे आवश्यक आहे. याबाबतची स्टेप बाय स्टेप प्रोसेस जाणून घेवूयात.
स्टेप बाय स्टेप प्रोसेस
स्टेप 1. सर्वप्रथम एकात्मिक सदस्य पोर्टलवर जा आणि यूजरनेम आणि पासवर्डसह लॉग इन करा.
स्टेप 2. आता Manage टॅबवर क्लिक करा.
स्टेप 3. ड्रॉप डाऊन मेन्यूमधून KYC निवडा.
स्टेप 4. आता बँक निवडा आणि बँक अकाऊंट नंबर, नाव आणि आयएफएससी कोड भरून Save वर क्लिक करा.
स्टेप 5. ही माहिती एकदा एम्प्लॉयर म्हणजेच कंपनीकडून अप्रूव्ड झाल्यानंतर अप्रूव्ड केवायसी सेक्शनमध्ये दिसेल आणि अशाप्रकारे तुमच्या नव्या बँक खात्याची माहिती ईपीएफ अकाऊंटसोबत अपडेट होईल.
Thackeray Government Big Decision | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! राज्यातील महिला पोलिसांची ड्युटी आता 8 तासांची
असा जाणून घ्या पीएफ बॅलन्स
यासाठी ईपीएफओ पासबुक पोर्टलवर जा. यूएएन आणि पासबुकने लॉगइन करा. यानंतर डाऊनलोड व्ह्यू पासबुकच्या ऑपशनवर क्लिक करा. प्ले स्टोरवरून उमंग अॅप डाऊनलोड करा. या अॅपवर अनेक सरकारी सेवा उपलब्ध आहेत. यामध्ये ईपीएफओ ऑपशन निवडल्यानंतर एम्प्लॉई सेंट्रीक सर्व्हीस निवडा. आता युएएन नंबर टाका. यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी प्राप्त होईल. तुम्ही व्ह्यू पासबूक अंतर्गत ईपीएफ बॅलन्स चेक करू शकता. (EPF Account)
Manohar Mama Bhosale | छातीत दुखू लागल्याने मनोहरमामा भोसले सोलापूर रुग्णालयात दाखल