EPF | नवीन नियमाचे पालन केल्यास PF ग्राहकांना होईल 7 लाख रुपयांचा फायदा, जाणून घ्या पूर्ण माहिती
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) च्या कस्टमर्सला, सर्व प्रकारचे फायदे घेण्यासाठी लवकरच आपले ईपीएफ नॉमिनेशन डिजिटल (EPF Nomination Digital) प्रकारे दाखल करावे लागेल. याबाबत, ईपीएफने काही दिवसांपूर्वीच एक नोटिफिकेशन जारी करून सर्वांना ई-नामांकन दाखल करण्याची विनंती केली आहे, जेणेकरून अकाऊंट होल्डरच्या कुटुंबाची सामाजिक सुरक्षा ठरवता यावी.
EPFO मेंबर्सच्या इन्श्युरन्स कव्हरची सुद्धा सुविधा एम्प्लॉई डिपॉझिट लिंक्ड इन्श्युरन्स स्कीम (EDLI Insurance cover) अंतर्गत मिळते. स्कीममध्ये नॉमिनीला कमाल 7 लाख रुपयांचा इन्श्युरन्स कव्हर दिले जाते.
ईपीएफओने ट्विट करत म्हटले की, सदस्यांनी आपल्या कुटुंबाला सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी आजच ई-नामांकन दाखल केले पाहिजे. ईपीएफ / ईपीएस नामांकन डिजिटल प्रकारे दाखल करण्यासाठी या सोप्या स्टेपचे पालन करा. आपल्या ट्विटमध्ये ईपीएफओने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये स्टेप बाय स्टेप गाईड केले आहे की हे कसे करावे.
अशाप्रकारे करा डिजिटल नॉमिनेशन
– EPFO वेबसाइटवर जाऊन ‘सर्व्हिसेस’ सेक्शनमध्ये ‘फॉर इम्प्लॉइज’वर क्लिक करा.
– आता ‘मेंबर UAN/ऑनलाइन सर्व्हिस (ओसीएस/ओटीसीपी) वर क्लिक करा.
– आता यूएएन आणि पासवर्ड टाकून लॉगइन करा.
– ‘मॅनेज’ टॅबमध्ये ‘ई-नॉमिनेशन’ सिलेक्ट करा.
– यानंतर स्क्रीनवर ‘प्रोव्हाईड डिटेल्स’ टॅब येईल, ‘सेव्ह’वर क्लिक करा.
– फॅमिली डिक्लेरेशन अपडेट करण्यासाठी ‘यस’वर क्लिक करा.
– आता ‘अॅड फॅमिली डिटेल्स’वर क्लिक करा. एकपेक्षा जास्त नॉमिनी अॅड करू शकता.
– कोणत्या नॉमिनीच्या वाट्याला किती अमाऊंट येईल, यासाठी ‘नॉमिनेशन डिटेल्स’ वर क्लिक करा. यानंतर ‘सेव्ह ईपीएफ नॉमिनेशन’वर क्लिक करा.
– ओटीपी जनरेट करण्यासाठी ‘ई-साइन’वर क्लिक करा. ओटीपी आधारसोबत लिंक मोबाइल नंबरवर येईल.
– ओटीपी योग्य ठिकाणी भरा.
नॉमिनेशन केलेले नसल्यास सदस्याच्या मृत्यूनंतर क्लेम करण्याची प्रोसेस कठिण होते. ऑनलाइन माध्यमातून नॉमिनेशन डिटेल्स कसे भरावे ते जाणून घेवूयात. ईपीएफओने आता नॉमिनीची माहिती देण्यासाठी ई नामांकनाची सुविधा सुरू केली आहे. ऑनलाइन नॉमिनीचे नाव, जन्म तारीख इत्यादी माहिती अपडेट केली जाते.
Web Title : EPF | follow this new rule by pf subscribers to receive benefits worth rs 7 lakh
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Pune Crime | बिर्याणीवरून झालेल्या वादातून खुनाचा प्रयत्न, न्यायालयाने दोघांना सुनावली कोठडी
Pimpri Crime | महिलेचा पाठलाग करत केली शरीर सुखाची मागणी; तरुणावर FIR दाखल