EPF Interest | PF च्या रकमेवरील व्याज अकाऊंटमध्ये जमा झाले नाही?, चिंता करु नका; जाणून घ्या सविस्तर
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – EPF Interest | कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (Employee Provident Fund Organization) नुकतेच व्याज (EPF Interest) जमा करण्याची घोषणा केली होती. कर्मचारी भविष्य निर्वाह निधीने (EPFO) गतवर्षीमध्ये व्याज जमा करण्यास सुरूवात केलीय. हे व्याज भारतातील जवळपास साडेसहा कोटी ग्राहकांच्या खात्यामध्ये जमा केले जात आहे. दरम्यान ज्या ग्राहकांच्या खात्यात अद्याप व्याजाची रक्कम जमा झाले नाही. ते व्याज दहा ते पंधरा दिवसात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्राहकांना 10 ते 15 दिवस वाट पहावी लागणार आहे.
विशेष म्हणजे, प्रत्येक झोन आणि कार्यालयानुसार खात्यात व्याज (EPF Interest) जमा केले जात असल्याने काही अवधी लागत आहे. आतापर्यंत सुमारे 4 कोटी खात्यांत व्याज जमा झाले आहे. बाकी खात्यांतही काही दिवसांत व्याज जमा होईल. जर 10-15 दिवसांनंतरही खात्यात व्याज जमा झाले नाही तर तुम्ही तुमच्या नियोक्त्याशी अथवा थेट ईपीएफ कार्यालयाशी संपर्क साधू शकता. असं EPF प्रकरणातील तज्ज्ञ चंद्रशेखर परसाई (Chandrasekhar Parsai) यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, दरवर्षी मार्च ते फेब्रुवारी दरम्यान जमा होणारे PF रकमेवरील व्याज यावेळी उशिरा जमा होत आहे.
पण,असे असले तरी यातून तुमचे नुकसान होणार नाही. कारण व्याज मोजण्याचा EPFO चा फॉर्म्युला जुनाच आहे.
ग्रहाकांना वेळाने व्याज येत असले तरी ते मार्च 2021 पासूनच क्रेडिट केले मानले जाणार आहे.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेकडून आर्थिक वर्ष 2020-21 साठी 8.5 टक्के व्याज जारी (EPF Interest) करण्यात आले आहे.
दरम्यान, ग्राहकांच्या खात्यात फेब्रुवारीपर्यंत 1 लाख रुपये असतील तर तुमच्या खात्यात 8500 रुपये जमा होणार आहेत.
Web Title :- EPF Interest | epf interest has not come in your pf account yet still do not worry money will credit in 12 to 15 days epfo news
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
- Tim Paine | अश्लील मेसेज अन् आक्षेपार्ह फोटो पाठवल्याच्या प्रकरण ! अॅशेस सीरिजपूर्वी ऑस्ट्रेलियाचा टेस्ट टीमचा कॅप्टन टीम पेनचा राजीनामा
- Police Patil | पोलीस पाटील पदासाठी 12 वी हवीच ! 10 वी पास उमेदवारांची नियुक्ती रद्द; ‘मॅट’चा महत्त्वपूर्ण निर्णय
- IPS Rashmi Shukla | भीमा-कोरेगाव दंगल प्रकरण : IPS रश्मी शुक्ला आयोगासमोर हजर; मात्र, ‘या’ कारणामुळं साक्ष नोंदवण्यात आली नाही