तुमच्या EPF अकाऊंटमध्ये लवकरच येणार पैसे, ‘या’ पध्दतीनं तपासा तुमचं EPFO पासबुक

नवी दिल्लीः वृत्तसंस्था – वित्तीय वर्ष 2019-20 साठी व्याज रक्कम लवकरच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ) च्या कर्मचार्‍यांच्या खात्यात येणार आहे. ईपीएफओने 2019-20 साठी 8.50 टक्के व्याज देण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी हे पैसे दोन हप्त्यात जमा होतील. या महिन्यात ही रक्कम 8.15 टक्के दराने जमा केली जाईल. यानंतर, उर्वरित 0.35 टक्के रक्कम डिसेंबरमध्ये ग्राहकांच्या खात्यात जमा होईल.

ईपीएफओच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाचे सदस्य प्रभाकर बनसेर यांच्या म्हणण्यानुसार, सर्व ग्राहकांना 8.5 टक्के दराने व्याज देण्यासाठी 61000 कोटींची आवश्यकता आहे, परंतु ईपीएफओकडे इतके पैसे नाहीत, यामुळे सध्या 8.15 टक्के दराने व्याज देण्यात येईल. त्यांनी झी बिझिनेसला सांगितले की, ईपीएफओ आपल्या ईटीएफमधील उर्वरित भाग विक्री करेल आणि उर्वरित भाग डिसेंबरमध्ये देईल.

मिस्ड कॉलद्वारे बॅलन्स तपासा:
ईपीएफओने आपल्या सदस्यांना पीएफ शिल्लक तपासणी करण्यासाठी विविध सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. ईपीएफओ ग्राहक मिस कॉलद्वारे पीएफ बॅलेंस तपासू शकता. याशिवाय पीएफ बॅलन्स ऑनलाईन किंवा एसएमएसद्वारेही ओळखता येईल. सदस्याला ईपीएफओमध्ये नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर 011-22901406 वर मिस कॉल द्यावा लागेल, त्यानंतर लवकरच त्याला एक मेसेज मिळेल. हा संदेश AM-EPFOHO कडून येईल. संदेशामध्ये आपल्या खात्याविषयी सर्व माहिती आहे. सदस्य आयडी, पीएफ क्रमांक, नाव, जन्मतारीख, ईपीएफ बॅलन्स, अंतिम योगदानाची माहिती उपलब्ध आहे. आपली कंपनी खाजगी विश्वस्त असल्यास आपल्याला बॅलन्स तपशील मिळणार नाही.

ऑनलाईन पीएफ बॅलन्स तपासा:

ईपीएफओ वेबसाइटवर बॅलन्स तपासणीची सुविधा उपलब्ध आहे. वेबसाइटच्या उजव्या बाजूला ई-पासबुकची लिंक सापडेल.

सदस्याला त्यांचा यूएएन क्रमांक व पासवर्ड प्रविष्ट करावा लागतो.

वेबसाइटवर यूएएन क्रमांक आणि पासवर्ड प्रविष्ट केल्यानंतर व्ह्यू पासबुकवर क्लिक करा. याद्वारे तुम्हाला बॅलन्स कळेल.

या व्यतिरिक्त, यूएएन क्रमांक आणि पासवर्डद्वारे ईपीएफओच्या अ‍ॅपवर बॅलन्स माहित करुन घेऊ शकता.