6 कोटी लोकांना EPFO ने दिला मोठा दिलासा ! नोकरी सुटल्यानंतर सुद्धा मिळेल ‘ही’ खास सुविधा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) इंडिव्हिज्युअल मेंबर्सना epf members नोकरी सोडल्यानंतर सुद्धा कोविड अ‍ॅडव्हान्स सर्व्हिसचा Covid Advance Service फायदा घेण्याची परवानगी आहे. ईपीएफओनुसार, जर कुणाची नोकरी सुटली आहे आणि त्यास अजूनही एखाद्या कंपनीत जॉईन व्हायचे आहे तर पीएफ फंडचा काही भाग अजूनही कोविड अ‍ॅडव्हान्स म्हणून काढता येऊ शकतो. अ‍ॅडव्हान्स असल्याने, कर्मचार्‍याला प्रोव्हिडंट फंड (PF) खात्यात पैसे परत टाकण्याची आवश्यकता नाही.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

ईपीएफओकडे स्पेसिफिक पीएफ अ‍ॅडव्हान्स नियम, फॉर्म आणि अशाप्रकारची अ‍ॅडव्हान्स लाभ घेण्याची प्रक्रिया आहे,
ज्यामध्ये कोविड-19 चा सुद्धा समावेश आहे.
ईपीएफ सबस्क्रायबर्स तीन महिन्यासाठी मूळ वेतन आणि महागाई भत्त्याच्या DA मर्यादेपर्यंत किंवा ईपीएफ खात्यात EPF account सदस्याच्या जमा रक्कमेच्या 75 टक्केपर्यंत, जे सुद्धा कमी असेल काढू शकतात.

अ‍ॅडव्हान्सवर लागू नाही इन्कम टॅक्स
पीएफ अ‍ॅडव्हान्स अप्लाय करण्यासाठी कर्मचारी ईपीएफ इंडियाची वेबसाइट किंवा आपल्या फोनवरून युनिफाईड पोर्टवर लॉग इन करावे लागेल.
जरी तुम्ही वैद्यकीय किंवा इतर गरजांसाठी अगोदर पीएफ अ‍ॅडव्हान्स प्राप्त केले असेल तरी सुद्धा या अ‍ॅडव्हान्ससाठी अर्ज करू शकता.
सोबतच, ईपीएफओने (EPFO) म्हटले की, ईपीएफ EPF योजनेच्या अंतर्गत प्राप्त कोणत्याही अ‍ॅडव्हान्सवर इन्कम टॅक्स लागू होत नाही.

पूर्ण करावी लागेल केवायसी
जर तुमची केवायसी KYC अपडेट नसेल तर अ‍ॅडव्हान्स मिळणार नाही.
यासाठी तुमचे UAN, आधार सोबत जोडलेले असावे आणि बँक खात्याची केवायसी आणि मोबाइल नंबरला यूएएनमध्ये जोडलेले असावे.
मेंबर पोर्टलवर आपले केवाईसी जमा करावे लागेल.
सर्व पूर्तता केलेली असेल तर अवघ्या 3 दिवसात दावा निकाली निघू शकतो.

Wab Title : epf members can now get covid advance facility after job loss konw about it

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

LIC CSL ने लाँच केले गिफ्ट कार्ड ’शगुन’, 10,000 रुपयांपर्यंत करू शकता शॉपिंग, जाणून घ्या डिटेल

Pradeep Sharma | एन्काऊंटर फेम माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्या घरी NIA चा छापा

Pune Police | पुणे पोलिसांची जळगावमध्ये पुन्हा एकदा मोठी कारवाई; भुसावळच्या माजी उपनगराध्यक्षासह काहींना घेतले ताब्यात