EPF अकाऊंट बद्दल समस्या असेल तर ‘नो-टेन्शन’, अशाप्रकारे तक्रार करून पाहा ‘स्टेटस’, जाणून घ्या
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुम्ही EPFO Subscriber आहात तर तुम्हाला पीएफ आणि पेन्शन फंडचे ट्रान्सफर, पीएफ काढणे याची गरज पडत असेल. परंतु अनेक तांत्रिक कारणाने पीएफशी संबंधित कामाच्या समस्या उद्भवतात. त्यामुळे तुम्हाला काही तक्रार असेल तर तुम्ही तुमच्या कंपनीच्या एचआर विभागाशी संपर्क साधू शकतात, परंतु अनेकदा येथे देखील निवारण होत नाही. त्यामुळे ईपीएफ मेंबरची ही समस्या पाहून विभागाने http://epfigms.gov.in/ हे एक पोर्टल सुरु केले आहे.
या पोर्टलच्या माध्यामातून तुम्ही तुमची तक्रार दाखल करु शकतात. रिमाइंडर पाठवू शकतात. याशिवाय इतर अनेक सुविधा तुम्हाला येथे उपलब्ध होतील.
https://twitter.com/socialepfo/status/1209390453654609921
या पोर्टलवर मिळणार या सुविधा –
– PF Member, EPS Pensioner आणि नियोक्ता किंवा इतर तक्रार करु शकतात.
– ओटीपीच्या माध्यमातून वेरिफिकेशन करावे लागेल.
– यूएएनच्या माध्यमातून तक्रार दाखल केली जाऊ शकते.
– एका यूएएनसंबंधित एक पेक्षा जास्त पीएफ नंबरवर तक्रार दाखल करु शकतात.
– विलंबित तक्रारींसाठी रिमाइंडर पाठवता येईल.
– तक्रारीचे स्टेट्स पाहिले जाऊ शकते.
EPFO Subscribers अशी दाखल करु शकतात तक्रार –
1. सर्वात आधी http://epfigms.gov.in/ वर लॉन्गिन करा.
2. पीएफ मेंबर, ईपीएस पेंशनर, इम्पॉयर आणि इतर मधील पर्याय निवडा.
3. पीएफ मेंबर आपला UAN टाकून कॅच्पा कोड टाकून गेट डिटेल्स वर क्लिक करा.
4. त्यानंतर तुम्हाला ओटीपी येईल.
5. ओटीपी व्हेरिफाय झाल्यानंतर आपला पत्ता टाकावा लागेल.
6. त्यानंतर पीएफ नंबर निवडून तुमची समस्या सांगावी लागेल.
7. तुम्ही काही कागदपत्र देखील अटॅच करु शकतात.
8.त्यानंतर सबमिटवर क्लिक करा.
9. त्यानंतर तक्रारीचा एक नंबर तुम्हाला येईल.
10. याच नंबरचा वापर तक्रारीचे स्टेट्स पाहण्यासाठी तुम्ही करु शकतात.
फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/
- जाणून घ्या ; ‘व्हिटॅमिन सी’चे आरोग्याला होणारे ‘हे’ ७ फायदे !
- ‘या’ ५ स्टेपमध्ये करा हा व्यायाम, कमी होईल लठ्ठपणा आणि पोटाचा घेर
- तुळस आरोग्यासाठी गुणकारी; ‘हे’ आहेत ६ फायदे !
- ‘मायग्रेन’चा त्रास होतोय ? ‘या’ ६ प्रकारे घ्या काळजी
- शिंकताना डोळे बंद का होतात ? शिंक का येते ? ‘ही’ आहेत २ कारणे
- …म्हणून खावी भेंडीची भाजी, ‘हे’ आहेत ८ आरोग्यदायी फायदे
- दातांच्या आरोग्याबाबत ‘या’ ५ गैरसमजांवर ठेवू नका विश्वास