EPF कडून निवृत्तीनंतर मिळू शकतात 2.79 कोटी रुपये, मुळ पगाराच्या 24% करावी लागेल गुंतवणूक; जाणून सविस्तर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – निवृत्तीसाठी लोक विविध ठिकाणी गुंतवणूक करतात. परंतु तुम्हाला वेगळी गुंतवणूक करायची असेल तर EPF तुमच्या मदतीला येऊ शकते. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) कर्मचार्‍यांना एक संधी देते की, जर त्यांनी EPF मध्ये आपल्या पगारातील काही भाग गुंतवला तर निवृत्तीच्या वेळी एक चांगला नफा मिळू शकतो.

 

2.79 कोटी फंड मिळू शकतो
जाणकारांनुसार, जर तुमची बेसिक सॅलरी 20,000 आणि 24% (12% इम्प्लॉई+ 12% एम्प्लॉयर) EPF 25 वर्षाच्या वयापासून गुंतवणूक केली तर 4800 रुपये दरमहिना गुंतवणूक होईल. जर 25 वर्षापासून सातत्याने गुंतवणूक करत राहिलात तर निवृत्तीच्या वेळी तुम्हाला 2.79 कोटी फंड मिळू शकतो.

 

येथे जाणून घ्या कसा तयार होईल निवृत्ती निधी
EPF मध्ये गुंतवणुकीच्या दरम्यान तुम्हाला 8.5% व्याजदर दिला जातो. जर तुम्ही सात टक्के सॅलरी हाईकच्या हिशेबाने मानले तर 25 वर्ष वयापासून गुंतवणूक काहीशी अशी असू शकते.

 

तर 2.30 कोटी मिळतील
जर गुंतवणूक सुरू करण्याचे वय 25 व्या वर्षी बेसिक सॅलरी 20,000 रुपये असेल तर निवृत्तीच्यावेळी 2.79 कोटी रुपये मिळू शकतात. अशाप्रकारे 30 वर्षाच्या वयात सॅलरी 28,051 रुपये केली गेली तर निवृत्तीच्या वेळी 2.30 कोटी मिळतील.

तर 1.85 कोटी मिळतील
35 वर्षाच्या वयात सॅलरी 39,343 रुपये असेल तर निवृत्तीच्या वेळी 1.85 कोटी मिळतील.
40 वर्षाच्या वयापासून जर तुम्ही गुंतवणुकीस सुरूवात केली तर 55,181 रुपये बेसिक सॅलरीवर तुम्हाला 1.42 रुपये मिळतील.

 

तर 1.03 कोटी रुपये मिळतील
45 वर्षाच्या वयात बेसिक सॅलरी 77,394 रुपये असेल तर 1.03 कोटी रुपये मिळतील.
तर 50 वर्षाच्या वयात बेसिक सॅलरी 1,08,549 रुपये असेल तर 66.44 लाख निवृत्तीच्या वेळी मिळतील.

 

या गोष्टी लक्षात ठेवा
जोपर्यंत कोणतीही आपत्तीजनक स्थिती होत नाही तोपर्यंत एझऋ मधून पैसे काढू नका.
मधूनच पैसे काढले तर तुम्हाला हा ला पूर्ण मिळू शकत नाही.

– वारंवार पैसे काढल्याने वृद्धत्वाची बचत कमी होत राहील.

– काही हजार रूपये काढले तरी रिटायर्मेंट फंडवर लाखो रुपयांचा डेंट पडतो.

– जर 30 वर्षाच्या वयात तुम्ही झऋ अकाऊंटमधून 1 लाख रुपये काढले तर 60 वर्षाच्या वयात 11.55 लाख रुपये रिटायरमेंट फंडातून कमी होतील. (EPF)

 

Web Title :- EPF | you can get rs 2 crore 79 lakhs on retirement from epf 24 percent of basic salary will have to be invested

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Airtel Prepaid Tariff Rates | भारती एयरटेलने प्रीपेड टॅरिफमध्ये केली 25% पर्यंत वाढ, जाणून घ्या कधीपासून होणार लागू

Nashik Crime | पोलीस भरती परीक्षेत अपयश आल्याने तरुणाने उचललं टोकाचं पाऊल; परिसरात खळबळ

Param Bir Singh | ’मला मुंबईत यायला भीती वाटते’, परमबीर सिंह यांच्या युक्तीवादावर SC ने दिला ‘हा’ आदेश