लाखो पेन्शनर्ससाठी खुशखबर ! EPFO ने जारी केले 868 करोड रुपये, ‘या’ खातेदारांच्या खात्यात येईल रक्कम

नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (ईपीएफओ) कर्मचारी पेन्शन योजनेंतर्गत पेन्शन फंडमधून आंशिक पैसे काढण्याची सुविधा (कम्युटेशन) देण्याचा निर्णय लागू केल्यानंतर आता ईपीएफओने 105 करोड रुपयांच्या एरियरसह 868 करोड रुपयांची पेन्शन जारी केली आहे. यामुळे लाखो पेन्शनधारकांना फायदा मिळेल. आता ही सुविधा त्या लोकांना देण्यात येईल, ज्यांनी 25 सप्टेंबर 2008 ला किंवा त्यापूर्वी याचा पर्याय निवडला होता. पेन्शन कम्युटेशन अंतर्गत पेन्शनमध्ये पुढील 15 वर्षांपर्यंत एक तृतीयांश कपात होते आणि कमी झालेली रक्कम एकमापी दिली जाते. 15 वर्षानंतर पेन्शनधारकांना पूर्ण रक्कम घेण्याचा हक्क असतो.

ऑगस्ट 2019 मध्ये कामगार मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ईपीएफओचा निर्णय घेणार्‍या मुख्य व्यवस्था असलेल्या केंद्रीय विश्वस्थ मंडळाने 6.3 लाख पेन्शनधारकांसाठी कम्युटेशनची सुविधा देण्याच्या प्रस्तावाला मंजूरी दिली होती.

सरकारकडून जारी वक्तव्यानुसार, प्रथम कम्युटेड पेन्शन देण्याची कोणतीही तरतूद नव्हती आणि पेन्शनर्सला कम्युटेशनच्या बदल्यात आयुष्यभर कमी पेन्शन मिळत होती. मंत्रालयाने म्हटले की, कर्मचारी पेन्शन स्कीम 1995 अंतर्गत हे पेन्शनर्सच्या फायद्यासाठी उचलण्यात आलेले ऐतिहासिक पाऊल आहे.

ईपीएफओ आपल्या 135 प्रादेशिक कार्यालयांद्वारे 65 लाख पेन्शनर्सला पेन्शन देते. ईपीएफओचे अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी कोविड-19 लॉकडाऊनच्या दरम्यान अनेक अडचणी असूनही मे 2020 च्या पेन्शन रक्कमेची प्रक्रिया केली आहे. जेणेकरून पेन्शनर्सला ठरलेल्या वेळी पेन्शन मिळण्यात कोणतीही अडचण येऊ नये.

यापूर्वी फेब्रुवारीमध्ये कामगार मंत्रालयाने ईपीएस-95 अंतर्गत पेन्शन कम्युटेशनची व्यवस्था देण्याचा ईपीएफओचा निर्णय लागू केला होता. यामुळे 6.3 लाख पेन्शनर्सला फायदा होईल.

सब्सक्रायबर द्वारे पेन्शन फंडमधून आंशिक पद्धतीने पैसे काढल्यावर 15 वर्षापर्यंत कमी पेन्शन मिळते. या व्यवस्थेला पेन्शन कम्युटेशन म्हणतात. मंत्रालयाच्या निर्णयानंतर या पेन्शनर्सला सुद्धा 15 वर्ष पूर्ण झाल्यानंतर पूर्ण पेन्शन प्राप्त करण्याचा हक्क प्राप्त आहे.

यापूर्वी ईपीएसफ-95 अंतर्गत सदस्यांना आपल्या पेन्शनचा 10 वर्षापर्यंतचा एक तृतीयांश भाग काढण्याची परवानगी होती. यानंतर पूर्ण पेन्शन 15 वर्षानंतर दिली जात होती. केंद्र सरकारच्या काही श्रेणीतील कर्मचार्‍यांसाठी ही सुविधा अजूनही आहे.

यापूर्वी कम्यूटेड पेन्शनच्या रिस्टोरेशनची तरतूद नव्हती. या कारणामुळे पेन्शनर्सला आयुष्यभर कमी झालेली पेन्शनच मिळत होती. कम्यूटेड पेन्शनच्या रिस्टोरेशनचे पाऊल पेन्शनर्सला फायदा देण्यासाठी ईपीएस -95 अंतर्गत एक ऐतिहासिक पाऊल आहे.

याद्वारे 6.3 लाख पेन्शनर्सला फायदा झाला आहे. पेन्शन कम्युटेशनचा पर्याय निवडणार्‍यांना मासिक पेन्शनमध्ये पुढील 15 वर्षापर्यंत एक तृतीयांश कपात होत होती आणि कमी झालेली रक्कम एकमापी दिली जात होती. 15 वर्षानंतर पेन्शनधारकाला पूर्ण रक्कम घेण्याचा हक्क मिळत होता.

कामगार मंत्रालयाने 25 सप्टेंबर 2008 ला किंवा त्यापूर्वी ईपीएफओच्या पेन्शन फंडातून आंशिक पैसे काढण्याच्या सुविधेचा लाभ घेणार्‍या पेन्शनधारकांसाठी पेन्शन कम्यूटेशन रिस्टोरेशनची सुविधा देण्याबाबत अधिसूचना 20 फेब्रुवारीला जारी केली होती. या निर्णयामुळे 6.3 लाख पेन्शनधारकांना लाभ मिळणार आहे.