EPFO | नोकरदारांनी लक्ष द्यावे | EPF नियमांमध्ये झाले ‘हे’ 5 मोठे बदल, जाणून घेतल्यास होईल फायदा
नवी दिल्ली : कोरोना संकटात नोकरी करणार्यांसाठी ईपीएफओने अनेक मोठी पावले उचलली आहेत. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) नुकतेच आपल्या प्रोव्हिडंट फंड च्या जमा रक्कमेतून ईपीएफ काढण्यासह अनेक घोषणा केल्या आहेत. EPFO ने नोकरी करणार्यांना ईपीएफ खात्यातून दुसर्यांदा कोविड-19 अॅडव्हान्स काढण्याची सुविधा दिली आहे. हे नॉन-रिफंडेबल अॅडव्हान्स आहे. जर कुणी ईपीएफ खातेधारक कोणत्याही प्रकारच्या आर्थिक संकटाचा सामना करत असेल तर तो पीएफमधून पैसे काढून फंड जमवू शकतो. ईपीएफओने केलेले 5 मोठे बदल जाणून घेवूयात…
सेकंड कोविड अॅडव्हान्स
ईपीएफओने घोषणा केली आहे की, एक ईपीएफ खातेधारक ज्याने पहिल्या लाटेत कोविड अॅडव्हान्स घेतले आहे, तो आता आपल्या पीएफ खात्यातून दुसरे कोविड अॅडव्हान्स घेण्यास पात्र आहे. ईपीएफ सबस्क्रायबर्स तीन महिन्यासाठी मूळ वेतन आणि महामागाई भत्त्याच्या मर्यादेपर्यंत किंवा ईपीएफ खात्यात सदस्याच्या जमा रक्कमेच्या 75 टक्केपर्यंत जी कमी असेल ती काढू शकतात.
नॉन-रिफंडेबल अॅडव्हान्स
एक ईपीएफओ सदस्य, जो एक महिना किंवा त्यापेक्षा जास्त काळापासून नोकरीवर नाही, तो आपल्या पीएफ बॅलन्सच्या 75 टक्केपर्यंत रक्कम काढू शकतो. ईपीएफओ मेंबर्सना ईपीएफओ पेन्शन नियमांतर्गत पेन्शन लाभ जारी ठेवण्यात सक्षम बनवण्यासाठी पीएफ खाते बंद न करता ईपीएफ खातेधारकाला ही सुविधा दिली आहे.
EDLI स्कीमच्या अंतर्गत 7 लाखांचा इन्शुरन्स
ईपीएफओने ईडीएलआय योजना अंतर्गत कमाल विमा लाभ 6 लाख रुपयांवरून वाढवून 7 लाख रुपये केला आहे. जर एखाद्या ईपीएफ खातेधारकाचा सेवेच्या दरम्यान मृत्यू झाला तर त्याच्या नॉमिनीला किंवा कायदेशीर वारसाला (जो लागू आहे) 7 लाख रुपये मिळतील.
EPF आधार सीडिंग
ईपीएफओने ईपीएफ आणि पीएफ खातेधारकांसाठी आपल्या संबंधित ईपीएफ खात्याला आधार कार्डशी संलग्न करणे अनिवार्य केले आहे.
Aadhaar-EPF खात्याला लिंक न करण्याच्या स्थितीत, कंपनी अशा ईपीएफ खात्यात योगदान करू शकणार नाही.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
कारण ईपीएफओ कंपनीला अशा ईपीएफ खात्यांसाठी ईसीआर (इलेक्ट्रॉनिक चलान-सह रिटर्न) दाखल करण्याची परवानगी देत नाही.
मात्र, आधार सत्यापित UAN च्यासह इलेक्ट्रॉनिक चलान म्हणजे पीएफ रिटर्नची रिसीट दाखल केल्यास अंमलबजावणीची कालमर्यादा वाढवून 1 सप्टेंबर 2021 करण्यात आली आहे.
नोकरी सुटल्यानंतर सुद्धा कोविड अॅडव्हान्स
एखादा ईपीएफओ सबस्क्रायबर आता नोकरी सुटल्यानंतर सुद्धा आपल्या ईपीएफ खात्यातून कोविड अॅडव्हान्स काढू शकतो.
परंतु, पूर्ण आणि अंतिम पीएफ काढण्याचा दावा केलेला नसावा.
Web Titel : EPFO | 5 epf updates that epfo subscribers you should know
bhaichand hirachand raisoni माझी चौकशी राजकीय हेतूने नव्हती, तर बीएचआरची राजकीय कशी ?
Pune News | कात्रजमध्ये दुचाकींवर झाड कोसळले, 22 दुचाकींचे नुकसान