EPFO | मोठा दिलासा ! Aadhaar सोबत PF खाते जोडण्याचा कालावधी वाढवला, जाणून घ्या कधीपर्यंत करू शकता लिंक?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – EPFO | दिल्ली उच्च न्यायालयाने (Delhi high court) कर्मचार्‍यांच्या भविष्य निर्वाह निधी खात्याच्या (EPF) युनिव्हर्सल अकाऊंट नंबर (UAN) सोबत आधार क्रमांक (Aadhaar number) जोडणे आणि पडताळणीची कालमर्यादा वाढवून 31 नोव्हेंबर 2021 केली (EPFO) आहे.

कोणतीही कारवाई करता येणार नाही
न्यायाधीश प्रतिभा एम. सिंहने या प्रकरणाशी संबंधीत सुनावणी करताना म्हटले की, या वाढवलेल्या कालमर्यादेपर्यंत कंपनीला त्या कर्मचार्‍यांच्या बाबतीत ज्यांच्या यूएएनसोबत आधार क्रमांक जोडलेला नाही त्यांचा भविष्य निर्वाह निधी जमा (EPFO) करण्याची परवानगी असेल आणि त्यांच्याविरूद्ध कोणतीही कारवाई केली जाणार नाही.

जाणून घ्या काय म्हटले?
आधारच्या निर्णयानुसार, आधारसोबत पडताळणी अथवा प्रमाणित करण्यात अयशस्वी राहिल्यास कायद्यांतर्गत कर्मचार्‍यांना कोणत्याही लाभापासून वंचित ठेवता येऊ शकत नाही. आदेशात म्हटले आहे की, ज्या व्यक्तींच्या आधार क्रमांकासोबत यूएएन जोडणे बाकी आहे, त्यांना ते पूर्ण करण्यासाठी 31 नोव्हेंबर 2021 पर्यंत वेळ दिला जाईल.

दंडात्मक कारवाई सुद्धा करता येणार नाही
न्यायधीशांनी म्हटले, या दरम्यान कंपन्यांना त्या कर्मचार्‍यांच्या बाबतीत भविष्य निर्वाह निधीत (EPF) अंशदान जमा करण्याची परवानगी असेल, ज्यांचा आधार क्रमांक यूएएनसोबत जोडणे बाकी आहे. तर ज्यांनी अजूनपर्यंत हे कले नाही, त्यांच्याविरूद्ध दंडात्मक कारवाई सुद्धा करता येऊ शकत नाही.

तक्रार निवारण अधिकार्‍याची नियुक्ती करेल EPFO
असोसिएशन ऑफ इंडस्ट्रीज अँड इन्स्टीट्यूशन्सच्या याचिकेवर सुनावणी करणार्‍या न्यायालयाने स्पष्ट केले की, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) एक तक्रार निवारण अधिकारी नियुक्त करेल.

 

तक्रार निवारण अधिकारी करेल हे काम

तक्रार निवारण अधिकार्‍याला याचिकाकर्त्याचे सदस्य किंवा एखाद्या अन्य कंपनीद्वारे संपर्क केला जाऊ शकतो,
जेणेकरून हे ठरवता येऊ शकते की, जमा करण्यात उशीर होत नाही आणि ते वेळेवर करण्यात आले.

पडताळणीशिवाय अंशदान जमा करता येईल
न्यायालयाने म्हटले की, असे कर्मचारी ज्यांचा आधार नंबर अगोदरपासून ईपीएफओकडे उपलब्ध करून देण्यात आला आहे,
त्यांच्या बाबतीत कंपन्यांना भारतीय सार्वभौमिक ओळख प्राधिकरणाकडून त्याच्या पडताळणीच्या प्रतीक्षेशिवाय भविष्य निर्वाह निधीत त्यांच्या खात्यात जमा करत येईल.
या दरम्यान पडताळणीची प्रक्रिया जारी राहील.

Web Titel :- EPFO | aadhaar uan linking delhi hc extends deadline to seed verify till 31 november

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | ट्रकचालकाच्या निष्काळजीपणामुळे तरुणाला गमवावा लागला जीव; सळई पोटात घुसून जागीच मृत्यू

Pune News | शिरूर तालुक्याचा नवा ‘पिंपळे पॅटर्न’; यूपीएससी परीक्षेत प्रतीक धुमाळचे घवघवीत यश

Karvy Stock | कार्वी स्टॉक ब्रोकिंगला झटका ! ED ने जप्त केले 700 कोटीचे शेयर, IndusInd व ICICI सह इतर बँकांनाही लावला 2,873 कोटींचा ‘चूना’