EPFOच्या खातेदारांनी लक्षात ठेवावं ! ‘या’ 3 अ‍ॅपव्दारे काम सोप होईल, कंपनीवर अवलंबून राहण्याची नाही गरज

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुमचे ईपीएफचे खाते आहे तर तुमच्यासाठी, तुमची गैरसोय टाळण्यासाठी काही खास अ‍ॅप आहेत, जे तुम्हाला तुमच्या ईपीएफची माहिती घरबसल्या देऊ शकतात. त्यामुळे कर्मचाऱ्यांना कंपनीवर निर्भर राहण्याची गरज नाही. श्रम आणि रोजगार मंत्री संतोष गंगवार यांनी हे तीन अ‍ॅप लॉन्च केले आहेत. App UAN Registration, e-Inspection आणि Digi Locker हे ते तीन अ‍ॅप आहेत. 67 व्या स्थापना दिवसाच्या निमित्त त्यांनी हे अ‍ॅप लॉन्च केले.

यावेळी संतोष गंगवार म्हणाले की हे App Ease of Doing Business (EODB) ला पुढे घेऊन जातील आणि ईपीएफओच्या कामाला प्रोस्ताहन मिळेल. ते म्हणाले की ईपीएफओ सदस्यांना चांगली सुविधा मिळावी यासाठी याचा मोठा वापर सुरु करण्यात आला आहे. तसेच पीएफचे ऑनलाइन ट्रांसफर, सेटलमेंट, डिजिटल स्वरुपात डिजिटल लॉकर देण्यात येतील.

त्यामुळे जर तुमचे ईपीएफ खाते आधारला जोडलेले असेल तर पैसे काढणे देखील सोपे असेल. याद्वारे क्लेम सेटलमेंटसाठी 10 दिवसांचा कालावधी लागेल.

कोणते आहेत हे तीन अ‍ॅप –

1) Online facility for UAN generation –
आता ईपीएफओचे सदस्य ईपीएफओच्या वेबसाइटवर जाऊन स्वत: UAN नंबर जनरेट करु शकतात. यासाठी कोणतीही मंजुरी घेण्याची आवश्यकता नाही. यात पीएफ पेंशन, लाइफ इंश्योरेंसचा लाभ घेण्यासाठी देखील रजिस्ट्रेशन उपलब्ध आहे.

2) EPS Pensioners PPO in DigiLocker website –
ईपीएफओचे इलेक्ट्रॉनिक पीपीओची डिपॉजिटरी बनवण्यासाठी नॅशनल ई-गवर्नेंस डिव्हिजनसाठी डिजीलॉकरला इंटीग्रेट करावा लागेल. ज्याचा फायदा पेंशनर्स घेऊ शकतात. याद्वारे पेपरलेस व्यवस्थेकडे पाऊल ठेवले जाईल.

3) e-Inspections (Digital interface of EPFO with employers) –
हे त्या लोकांसाठी ज्यांनी ईसीआर फायलिंग केले नाही, ते लोक याचा वापर करुन सर्व माहिती मिळवू शकतात.

ईपीएफओ ही जगातील सर्वात मोठी सामाजिक सुरक्षा देणारी संघटना आहे. ज्यात जवळपास 6 कोटी सदस्य आणि 65 लाख पेंशनर्स आहेत.

Visit : Policenama.com