EPFO | घरबसल्या नोंदवा EPF आणि EPS अकाऊंटसाठी वारसदाराचं नाव, स्टेप बाय स्टेप जाणून घ्या संपुर्ण प्रोसेस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – EPFO आपल्या गुंतवणुकदारांची सुविधा लक्षात घेवून EPF (Employees Provident Fund) किंवा EPS (Employees Provident Scheme) अकाऊंटमध्ये नॉमिनी घरबसल्या नोंदवण्याची सुविधा दिली आहे. लोकांना यासाठी जास्त धावपळ करावी लागू नये यासाठी ही पूर्ण प्रक्रिया डिजिटल केली आहे. नॉमिनी ऑनलाइन नोंदवण्याची प्रक्रिया जाणून घेवूया (EPFO).

स्टेप बाय स्टेप जाणून घ्या पूर्ण प्रोसेस

EPFO वेबसाइटवर लॉगइन करा. नंतर सर्व्हिसवर क्लिक करून Employees ऑपशनवर जा. नंतर Member UAN/Online Service वर क्लिक करा.

UAN आणि पासवर्डसोबत लॉगइन करा.

मॅनेज टॅबवर क्लिक केल्यानंतर E- Nomination सिलेक्ट करा.

Provide Details टॅबवर जा आणि पूर्ण माहिती देऊन Save करा.

फॅमिलीसंबंधी डिटेल्ससाठी Yes वर क्लिक करा.

फॅमिली डिटेल्स लिहा. (एकापेक्षा जास्त नॉमिनी नोंदवू शकता)

Nomination Details वर क्लिक करून नोंदवा किती टक्के शेयरचा अधिकार असेल.

नंतर E-Sign वर क्लिक करा. आधार रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर OTP जाईल. प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर नॉमिनी EPF/EPS खात्यात नोंदवले जातील.

Web Title :-  epfo add nominee in epf and eps account sitting at home understand the complete process step by step

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 6,843 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

IPL 2021 | UAE मध्ये मुंबई आणि चेन्नई यांच्यात होणार पहिला सामना, ‘या’ दिवशीपासून सुरू होणार आयपीएलची दुसरी फेज; जाणून घ्या पूर्ण शेड्यूल

Yavatmal Crime | भरदिवसा गोळीबाराचा थरार ! पुसदमध्ये डोक्यात गोळी लागून मेकॅनिकल इंजिनिअर तरुणाचा मृत्यू

SBI नं दिली नवीन माहिती ! डेबिट कार्ड हरवले किंवा डॅमेज झाल्यास कार्ड ब्लॉक करण्याची सांगितली पद्धत, जाणून घ्या (व्हिडीओ)