EPFO नं नोकरदारांना केलं ‘अलर्ट’ ! ‘या’ ऑफर्सपासून रहा सावधान, अन्यथा होईल मोठी फसवणूक, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कर्मचारी भविष्य निर्वाह संस्थेने नोकरदारांना सावधानतेचा इशारा दिला आहे. या संस्थेने वेबसाईट्स, टेलीकॉल्स, सोशल मीडिया आणि ईमेल्स वरून येणाऱ्या खोट्या मेसेजला भुलू नये असे आवाहन केले आहे. तुमचे कोणतेही काम करण्यासाठी बँकेत पैसे जमा करायला सांगितले तर सावध राहणे आवश्यक आहे नाहीतर तुमचे मोठे नुकसान होऊ शकते.

ही माहीती कोणालाही देऊ नका –

ईपीएफओने ने सांगितले की पेन्शन, क्लेम संदर्भात किंवा अन्य कोणत्याही कामासाठी बँकेत पैसे भरा असा मेसेज आला तरी त्या ऑफर्सकडे दुर्लक्ष केले पाहिजे. तुम्ही आधार, पॅन कार्ड नंबर, बँकेचे डिटेल्स अशी वैयक्तिक माहिती शेअर करु नये. त्याचबरोबर प्रॉव्हिडंट फंड असणाऱ्यांनी त्यांचा युनिव्हर्सल नंबर सुद्धा शेअर करू नये.

ईपीएफओने ट्विट करून सांगितले, आम्ही कधीही कोणाची वैयक्तिक माहिती जाणून घेण्यासाठी फोन करत नाही. त्यामुळे खोट्या फोनवर आपली माहिती जाहीर करू नये.

येथे करा तक्रार – 

तुमच्याबरोबर अशी एखादी फसवणुकीची घटना घडली तर तुम्ही श्रम मंत्रालयाकडे तक्रार करू शकता. तक्रार दाखल झाल्यानंतर श्रम मंत्रालय ईपीएफओला कारवाईचे आदेश देते. ईपीएफओ चा टोल फ्री नंबर 1800118005 आहे, जो 24*7 सुरू असतो.

तात्काळ जाणून घ्या तुमचा पीएफ बॅलेंस –

आपल्या नोंदणी केलेल्या मोबाईल नंबरवरून 011-22901406 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन तुम्ही तुमचा प्रॉव्हिडंट फंड चा बॅलन्स जाणून घेऊ शकता. ईपीएफओ सोशल मीडियावरती 6 कोटी सब्सक्राइबर्सना अनेक सुविधा पुरविते. यामध्ये 12 लाख नियुक्त आणि 65 लाख पेन्शनधारकांचा समावेश आहे. सोशल मीडियाद्वारे सुद्धा तुम्ही तक्रार करू शकता.