EPFO Alert | ६ कोटीपेक्षा जास्त लोकांना दिली महत्वाची माहिती, अजिबात करू नका हे काम

नवी दिल्ली : एम्प्लॉइज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन (EPFO) ने आपल्या ६ कोटींहून जास्त सदस्यांना अलर्ट (EPFO Alert) केले आहे. ईपीएफओ कर्मचाऱ्यांची पीएफ म्हणून कपात केलेली रक्कम व्यवस्थापित करते. ईपीएफओने आपल्या सदस्यांना सायबर क्राईमबाबत सतर्क केले आहे. तुम्हीही ईपीएफओचे सदस्य असाल तर तुमच्यासाठी ही खूप महत्त्वाची बातमी आहे. पीएफ अकाउंटच्या नावावर अनेक फसवणुकीचे प्रकार (Fraud in PF Account) समोर आले आहेत. फसवणूक करणारे सायबर गुन्हेगार ईपीएफओच्या नावाने (EPFO News) फोन कॉल्स आणि मेसेजद्वारे सदस्यांची वैयक्तिक माहिती मागत आहेत आणि लोक त्यांच्या फसवणुकीला बळी पडत आहेत. यामुळे ईपीएफओने सतर्क (EPFO Alert) राहण्याचा सल्ला दिला आहे (EPFO Warning).
EPFO ने ट्विट केले की, फेक कॉल्स आणि एसएमएसपासून सावध रहा. ईपीएफओ कधीही आपल्या सदस्यांना फोन, ई-मेल किंवा सोशल मीडियावर पर्सनल डिटेल्स शेअर करण्यास सांगत नाही. ईपीएफओ आणि त्यांचे कर्मचारी अशी माहिती कधीही विचारत नाहीत. ईपीएफओने आपल्या सदस्यांना त्यांचा यूएएन, पॅन, पासवर्ड, बँक अकाउंट डिटेल्स, ओटीपी, आधार आणि फायनान्शियल डिटेल्स कोणाशीही शेअर न करण्याचा सल्ला दिला आहे. सायबर गुन्हेगार ईपीएफओ सदस्यांच्या पर्सनल डिटेल्सचा वापर बेकायदेशीर पद्धतीने करू शकतात आणि सदस्यांना आर्थिक नुकसानही सहन करावे लागू शकते. (EPFO Alert)
#EPFO कभी भी अपने सदस्यों से व्यक्तिगत विवरण जैसे आधार, पैन, यूएएन, बैंक खाता या ओटीपी फोन या सोशल मीडिया पर साझा करने के लिए नहीं कहता है।#amritmahotsav #alert #beware #StaySafe #stayalert pic.twitter.com/Dp0QkJihhQ
— EPFO (@socialepfo) December 11, 2022
या मेसेज आणि कॉल्सपासून रहा सावध
– जर तुम्हाला ईपीएफओकडून मेसेज किंवा कॉल आला तर सावध व्हा, कारण तो फसवणुकीच्या उद्देशाने देखील असू शकतो.
– ईपीएफओने ट्विटरवर माहिती दिली की आधार कार्ड, पॅन नंबर, यूएएन आणि पासवर्डची माहिती देऊ नका. तसेच खाते क्रमांक, ओटीपी आणि पर्सनल डिटेल्स ईपीएफओ विचारत नाही.
– व्हॉट्सअॅप आणि इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून अशा गोष्टी शेअर करण्यास ईपीएफओ सांगत नाही. अशा मेसेजना उत्तर देऊ नका.
पीएफवर मिळते ८.१ टक्के व्याज
ईपीएफओ कर्मचार्यांच्या निवृत्तीसाठी सेवानिवृत्ती निधी गोळा करते. या अंतर्गत, कंपनी आणि कर्मचारी (Employees) दोघांच्या वतीने पैसे जमा केले जातात आणि ईपीएफ खात्याअंतर्गत कर्मचार्यांच्या मूळ पगाराच्या १२ टक्के आणि तेवढीच रक्कम कंपनीकडून कापली जाते. दरमहा जमा केलेल्या या रकमेवर वार्षिक ८.१% व्याज दिले जाते. सेवानिवृत्तीचे वय पूर्ण झाल्यावर कर्मचाऱ्यांना रक्कम दिली जाते.
Web Title :- EPFO Alert | epfo warning for pf account holders about fake calls and messages
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Jalna ACB Trap | 80 हजाराची लाच घेताना उप कार्यकारी अभियंता अॅन्टी करप्शनच्या जाळयात