5 कोटी नोकरदारांना मोठा दिलासा ! PF अकाऊंटमध्ये 15 मे पर्यंत मार्चचे पैसे जमा करणार कंपन्या
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रिटायरमेंट फंड संस्था एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन (ईपीएफओ) ने कोरोना व्हायरस साथीच्या संकटामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर कंपन्यांना दिलासा दिला आहे. त्याअंतर्गत आता नियोक्ते मार्चचा ईपीएफ 15 मेपर्यंत भरू शकतात. यामुळे 6 लाख कंपन्या आणि 5 कोटीहून अधिक ग्राहकांना दिलासा मिळणार आहे.
ईपीएफओच्या सामाजिक सुरक्षा योजनांमध्ये मार्च महिन्याचे योगदान 15 एप्रिलपर्यंत देय होते. ते आता वाढवून 15 मे केले आहे. कामगार मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, “कोरोना विषाणूमुळे आणि लॉकडाऊनमुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता मार्च महिन्याच्या पगारासाठी इलेक्ट्रॉनिक चालान सह रिटर्न (ईसीआर) सादर करण्याची तारीख 15 मे 2020 केली जात आहे. हे त्या नियोक्तांसाठी आहे, ज्यांनी आपल्या कर्मचार्यांना मार्च महिन्याचा पगार दिला आहे.
निवेदनानुसार मार्च 2020 ची ईसीआर सादर करण्याची अंतिम तारीख साधारणपणे 15 एप्रिल 2020 आहे. अशा प्रकारे, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आणि विविध कायदा 1952 (ईपीएफ आणि एमपी कायदा) अंतर्गत येणाऱ्या आस्थापनांना या वर्षाच्या मार्च महिन्यासाठी देय रक्कम आणि प्रशासकीय फी जमा करण्यासाठी अतिरिक्त 30 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे कि, कामगार व रोजगार मंत्रालयाच्या या निर्णयामुळे ज्यांनी यावर्षी मार्चपर्यंत आपल्या कर्मचार्यांच्या पगाराचे वितरण केले आले, त्यांना दिलासा मिळणार आहे. हे कोरोना विषाणूच्या साथीच्या दरम्यान कर्मचाऱ्यांना पगार दिल्यामुळे मालकांना एक प्रोत्साहन आहे.
नाही लागणार व्याज आणि दंड
ईसीआर भरण्यातील एका महिन्यातील स्थगितीचा फायदा 6 लाख कंपन्या व 5 कोटी भागधारकांना होईल. ईसीआर सबमिट करताना नियोक्तांना मार्च महिन्याच्या पगाराच्या वितरणाची तारीख प्रदान करणे आवश्यक आहे. ज्या नियोक्तांनी आपल्या कर्मचार्यांना मार्च महिन्याचा पगार दिला आहे, त्यांना केवळ ईपीएफ थकबाकी भरण्यासाठी अतिरिक्त वेळ देण्यात आला नाही तर, 15 मे किंवा त्यापूर्वी सादर केल्यास त्यावर व्याज आणि दंड द्यावा लागणार नाही.