EPFO Calls For Increasing Retirement Age | सरकारी कर्मचार्‍यांच्या निवृत्तीच्या वयावर मोठ्या निर्णयाची तयारी, अमेरिका-यूरोपच्या मॉडलवर विचार

नवी दिल्ली : EPFO Calls For Increasing Retirement Age | कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) देशातील कर्मचार्‍यांचे निवृत्तीचे वय (Retirement Age) वाढवण्याच्या बाजूने आहे. EPFO ने आपल्या व्हिजन डॉक्युमेंटमध्ये याचा उल्लेख केला आहे. प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशनचे म्हणणे आहे की सेवानिवृत्तीचे वय वाढवण्यासाठी इतर देशांच्या अनुभवानुसार सेवानिवृत्तीचा विचार केला जाऊ शकतो. यामुळे पेन्शन प्रणाली मजबूत होण्यास मदत होईल. सध्या 6 कोटींहून जास्त लोक EPFO शी संबंधित आहेत. जून 2022 मध्ये EPFO ने एकूण 18.36 लाख नवीन सदस्यांचा समावेश केला आहे. (EPFO Calls For Increasing Retirement Age)

अमेरिकेत निवृत्तीचे वय

इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार, EPFO ने आपल्या व्हिजन 2047 डॉक्युमेंटमध्ये म्हटले आहे की, देश निवृत्तीचे वय वाढवण्याचा विचार करू शकतो. सध्या भारतात निवृत्तीचे वय 58 ते 65 वर्षे आहे. खासगी कंपन्यांमध्ये निवृत्तीचे वय 58 वर्षे आहे. त्याचबरोबर सरकारने अनेक विभागांमध्ये सेवानिवृत्तीचे वय 65 वर्षे निश्चित केले आहे.

अमेरिका आणि युरोपच्या तुलनेत भारतात निवृत्तीचे वय कमी आहे. युरोपियन युनियनमध्ये निवृत्तीचे वय 65 वर्षे आहे. त्याच वेळी, इटली, डेन्मार्क आणि ग्रीसमध्ये 67 वर्षे आहे. अमेरिकेतील कर्मचार्‍यांचे निवृत्तीचे वय 66 वर्षे आहे.

14 कोटी होईल ज्येष्ठांची लोकसंख्या

अहवालानुसार, 2047 सालापर्यंत भारत वृद्ध लोकांची मोठी लोकसंख्या असलेला देश बनेल.
त्यावेळी 60 वर्षांवरील लोकांची संख्या 14 कोटींवर जाईल. यामुळे पेन्शन फंडावर दबाव वाढेल.
या कारणास्तव,ईपीएफओने निवृत्तीचे वय वाढविण्याचा विचार करण्यास सांगितले आहे.
निवृत्तीचे वय वाढल्यास, दीर्घकाळासाठी EPFO आणि इतर निधीमध्ये जास्त पैसे जमा केले जातील.
यामुळे पेन्शन व्यवस्थेवरील दबाव कमी होईल आणि महागाईचा प्रभाव कमी होण्यासही मदत होईल.

6 कोटींपेक्षा जास्त सदस्य

EPFO चे 6 कोटींहून जास्त सदस्य आहेत आणि ते 12 लाख कोटींहून जास्त पेन्शन आणि भविष्य निर्वाह निधीचे व्यवस्थापन करतात.
वृत्तानुसार, ईपीएफओ आपल्या प्लॅनमध्ये पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी (PFRDA) समाविष्ट करेल. PFRDA केंद्र सरकारची राष्ट्रीय पेन्शन योजना चालवते.

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (NSO) च्या 2021 च्या अहवालानुसार, 2021 मध्ये देशातील 60 आणि त्याहून जास्त वयाच्या वृद्धांची लोकसंख्या 138 मिलियन (13 कोटी 80 लाख) होती.
2031 मध्ये, हा आकडा 194 मिलियन (19 कोटी 40 लाख) पर्यंत पोहोचू शकतो.

Web Title :- EPFO Calls For Increasing Retirement Age | epfo calls for increasing retirement age to ease pressure on pension funds said its benefits for pension system

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Pimpri Crime | पुण्यातील धक्कादायक घटना ! अपहरण झालेल्या 7 वर्षाच्या मुलाचा खून, पिंपरीतील बिल्डरकडे मागितली होती 20 कोटीची खंडणी

Beauty Tips | तुम्ही सुद्धा चुकीच्या पद्धतीने Face Serum चा वापर करता का? मग व्हा सावध!

Bank Account Minimum Balance | SBI-HDFC-ICICI Bank साठी मोठी बातमी, दंड वाचवण्यासाठी आजच करा हे काम