खुशखबर ! 1 जानेवारी 2020 पासुन PF चा ‘हा’ नियम बदलणार, 50 लाखाहून अधिक लोकांना होणार फायदा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – EPF च्या नियमात मोठे बदल होणार आहेत. 1 जानेवारी 2020 पासून ईपीएफचे हे नियम लागू होतील. केंद्र सरकारच्या श्रम मंत्रालयाने एक नोटिफिकेशन जारी केले आहे. कर्मचाऱ्यांच्या सोशल सिक्योरिटीचा म्हणजेच सामाजिक सुरक्षेचा विचार करता कर्मचारी भविष्य निर्वाह संघटनेने हा निर्णय घेतला आहे. सध्याच्या 6 कोटी सदस्यांशिवाय जवळपास 50 लाख कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे त्या कर्मचाऱ्यांसाठी होईल ज्यांचा पीएफ अजून कापला गेला नाही.

Gazette
कुठे लागू होतील ईपीएफचे नियम –
नियमांनुसार प्रोवेडिंट फंड तेथे लागू होतो जेथे कोणत्याही संस्थेत, फर्ममध्ये, कार्यालयात 20 पेक्षा जास्त कर्मचारी असतात. या अधिनियमानुसार संस्थेलाच ईपीएफ सदस्यता दिली जाते. आता केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या सोशल सिक्योरिटी (सामाजिक सुरक्षेचा) देण्याच्या उद्देशाने मर्यादा कमी करुन 10 केली आहे. ज्या संस्थांमध्ये 10 किंवा त्यापेक्षा जास्त कर्मचारी आहेत त्या संस्था ईपीएफच्या अंतर्गत येतील.

ईपीएफओच्या अंतर्गंत येण्यासाठी आतापर्यंत होते हे नियम
ईपीएफमध्ये येणाऱ्या 10 किंवा त्यापेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या संस्थांना एम्प्लॉय प्रोवेडिंट फंड अ‍ॅण्ड मिसलेनियस प्रोविजन अ‍ॅक्ट अंतर्गंत स्वत:ची नोंदणी करावी लागेल. सध्या त्याच संस्था या कायद्यात आहेत, जेथे कर्मचाऱ्यांची संख्या 20 आणि त्यापेक्षा जास्त होती.

Visit : Policenama.com