×
Homeआर्थिकEPFO च्या 28 कोटी खातेधारकांचा Data Leak !, तुम्ही सुद्धा बळी पडला...

EPFO च्या 28 कोटी खातेधारकांचा Data Leak !, तुम्ही सुद्धा बळी पडला नाहीत ना ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – EPFO Data Leak | जर तुम्ही सुद्धा कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेशी (EPFO) संबंधीत असाल तर तुमच्यासाठी खुप मोठी धक्कादायक बातमी आहे. एका रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, सुमारे 28 कोटी पीएफ खातेधारकांचा (PF Account Holders) डाटा ऑनलाइन लीक (Data Leak) झाला आहे. यामध्ये आधारपासून बँक अकाऊंटपर्यंतच्या डिटेल्सचा समावेश आहे. (EPFO Data Leak)

 

दोन ‘IP अ‍ॅड्रेस’ वर डाटा लीक

यूक्रेनचे सायबर सिक्युरिटी रिसर्चर बॉब डियाचेंको (Bob Diachenko) यांनी मोठा दावा केला आहे, जो मोदी सरकार आणि पीएफ खातेधारकांसाठी अतिशय धक्कादायक आहे. याबाबत जारी रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की मागील 2 ऑगस्टला डियाचेंको यांनी शोध घेतला की, वेगवेगळ्या आयपी अ‍ॅड्रेस (IP Address) अंतर्गत ऑगस्टच्या सुरुवातीला पीएफ खातेधारकांचा डाटा लीक झाला आहे. एका आयपी अ‍ॅड्रेसमध्ये 28,04,72,941 खातेधारकांचा रेकॉर्ड सार्वजनिक करण्यात आला, तर दुसर्‍या आयपी अ‍ॅड्रेसमध्ये 83,90,524 खातेधारकांचा रेकॉर्ड लीक करण्यात आला आहे. (EPFO Data Leak)

 

UAN नंबरपासून या डिटेल्स लीक

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) खातेधारकांचा जो डाटा ऑनलाइन सार्वजनिक करण्यात आला आहे त्यामध्ये खातेधारकांचा यूनिव्हर्सल अकाऊंट नंबर (UAN), नाव, आधार डिटेल (Aadhaar Details), बँक अकाऊंट नंबर (Bank Account Number) आणि इतके की नॉमिनीच्या डिटेल्स सुद्धा सार्वजनिक करण्यात आल्या आहेत. रिपोर्टनुसार, शोधकर्त्याने सांगितले की, दोन्ही IP अ‍ॅड्रेस Azure-होस्टेड आणि भारत-आधारित होते. त्यांनी म्हटले की, ऑनलाइन लीक झालेल्या डाटाचा आढावा घेतल्यानंतर, मला जाणवले की मी काहीतरी मोठे आणि महत्वाचे पाहिले आहे.

 

शोधकर्त्याने Tweet करून दिली माहिती

रिपोर्टनुसार, डियाचेंको यांनी दावा केला की इतक्या मोठ्या संख्येने भारतीयांच्या पीएफ खात्याचा (PF Account) डाटा लीक झाल्याला दुजोरा मिळताच शोधकर्त्याने एका ट्विटमध्ये इंडियन कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमला टॅग करून डाटा लीकची माहिती दिली.
CERT-In ने त्यांच्या ट्विट (Tweet) चे उत्तर दिले आणि त्यांना ईमेलमध्ये हॅकसंबंधी रिपोर्ट देण्यास सांगितले.

 

दोन्ही आयपी अ‍ॅड्रेसमधून डाटा गायब

डियाचेंको यांच्या ट्विटच्या 12 तासांच्या आत दोन्ही आयपी अ‍ॅड्रेसवरून डिटेल्स हटवण्यात आले.
यूक्रेनच्या शोधकर्त्याने म्हटले की, आता दोन्ही आयपी अ‍ॅड्रेस हटवण्यात आले आहेत आणि कोणताही डाटा नाही.
रिपोर्टमध्ये डियाचेंको यांच्या संदर्भाने म्हटले आहे की, मागील 3 ऑगस्टपर्यंत या डाटासंबंधी कोणत्याही एजन्सी किंवा कंपनीकडून कोणतेही उत्तर मिळाले नव्हते.

 

Web Title : – EPFO Data Leak | epfo news provident fund data of 28 crore indians leaked online claimed in report tutc

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

 

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News