नोकरी बदलल्यानंतर EPFO मध्ये नोंदवली नाही Date of Exit, तर स्वत: करू शकता अपडेट; जाणून घ्या प्रोसेस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – EPFO | नोकरी बदलल्यानंतर जुनी कंपनी अनेकदा कर्मचार्याच्या UAN अकाऊंटमध्ये डेट ऑफ एग्झिट अपडेट करत नाही. ज्यामुळे जुन्या कंपनीची PF अमाऊंट तुमच्या नवीन कंपनीच्या पीएफ अमाऊंटमध्ये जोडली जात नाही आणि अशावेळी जुना फंड यूज करू शकत नाही. (EPFO)
जर तुमच्या बाबतीत सुद्धा डेट ऑफ एग्झिटबाबत अशीच समस्या असेल तर चिंता करण्याचे कारण नाही. यासाठी कोणती ऑनलाइन प्रक्रिया करावी ते जाणून घेवूयात.
का आवश्यक आहे डेट ऑफ एग्झिट अपडेट करणे –
जर ईपीएफओ रेकॉर्डमध्ये कंपनीने नोकरी सोडण्याची तारीख नोंद केली नाही तर ईपीएफ खातेधारक आपल्या ईपीएफ खात्यातून पैसे काढू किंवा ट्रान्सफर करू शकत नव्हता. आता ही अडचण दूर झाली आहे. (EPFO)
डेट ऑफ एग्झिट अपडेट करण्याची प्रक्रिया
– सर्वप्रथम मोबाइल किंवा कम्प्यूटरवर https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ उघडा.
– नंतर UAN, पासवर्ड आणि कॅप्चा टाकून लॉग इन करा.
– लक्षात ठेवा तुमचा UAN अॅक्टिव्ह असावा.
– आता नवीन उघडलेल्या पेजवरील सेक्शनमध्ये जाऊन ‘मॅनेज’ टॅबवर क्लिक करा.
– यानंतर ‘मार्क एग्झिट’ पर्याय निवडा. यानंतर तुमच्या समोर सिलेक्ट एम्प्लॉयमेंट ड्रॉपडाऊन उघडेल.
– ड्रॉपडाऊनमध्ये जुना PF खाते क्रमांक निवडा. येथे UAN शी लिंक असले पाहिजे.
– तुम्हाला स्क्रीनवर ते PF खाते आणि नोकरीशी संबंधीत डिटेल्स दिसतील.
– आता तुम्हाला नोकरी सोडण्याची तारीख आणि कारण टाकावे लागेल.
– नोकरी सोडण्याच्या कारणामध्ये रिटायरमेंट, शॉर्ट सर्व्हिस सारखे पर्याय असतील.
– आपल्या पर्यायाची निवड करून रिक्वेस्ट OTP वर क्लिक करा. OTP तुमच्या आधार कार्डशी लिंक मोबाइल नंबरवर पाठवला जाईल.
– OTP ला योग्य ठिकाणी टाकून रिक्वेस्ट सबमिट करा.
– प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नोकरी सोडल्याची तारीख PF खात्यात नोंदली गेल्याचा मॅसेज स्क्रीनवर येईल.
Web Title :- EPFO | date of exit is not recorded in epfo after changing job so you can update yourself
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Kolhapur News | मालवणच्या समुद्रात बुडणाऱ्या कोल्हापूरच्या 33 वर्षीय तरुणीला मिळालं जीवदान
83 Movie | दीपीका पादुकोण, कबिर खान आणि ’83’च्या निर्मात्यांविरोधात मुंबई कोर्टात फसवणूकीची तक्रार
SBI Customers Alert | उद्या बंद राहतील एसबीआयच्या इंटरनेट बँकिंग ! योनो लाईट, युपीआय सेवा