आर्थिकराष्ट्रीय

EPFO e Nomination Change Online | EPS आणि PF अकाऊंटमध्ये ई-नॉमिनी बदलायचा आहे का, फॉलो करा ‘या’ सोप्या स्टेप्स

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – EPFO e Nomination Change Online | कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) ग्राहकांना त्यांच्या पोर्टलवर ई – नामांकन नोंदणे अनिवार्य केले आहे. नॉमिनीची नोंद केल्यानंतरच योजनेचा लाभ घेता येणार नाही, असे पोर्टलच्या वतीने सांगण्यात आले आहे. जर तुम्ही अद्याप EPFO खात्यात नामनिर्देशित व्यक्तीचे नाव दाखल केले नसेल किंवा कोणत्याही कारणास्तव नॉमिनी बदलू इच्छित असाल, तर तुम्ही ते ऑनलाइन मोडद्वारे पूर्ण करू शकता. (EPFO e Nomination Change Online)

 

ऑनलाइन नॉमिनी अपडेट करण्याने होतील हे फायदे

1 – पीएफ खातेधारकाचा मृत्यू झाल्यास त्याची पीएफ रक्कम नॉमिनीला ट्रान्सफर केली जाते.
कोणत्याही पीएफ खातेधारकाच्या खात्यात नामनिर्देशित व्यक्ती नसल्यास त्याच्या कुटुंबाला पीएफची रक्कम मिळवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो.

2 – EPF चे पैसे खात्यात दोन प्रकारे जमा केले जातात. पहिला भविष्य निर्वाह निधी आणि दुसरा पेन्शन फंड (EPS).
कर्मचार्‍याच्या मूळ पगाराच्या 12 टक्के रक्कम त्याच्या पगारातून कापली जाते आणि तेवढेच योगदान कंपनी देते.

कर्मचार्‍यांच्या पगाराच्या 12% थेट EPF मध्ये जमा केले जातात, तर कंपनीच्या योगदानाच्या 3.67% EPF मध्ये आणि उर्वरित 8.33% कर्मचारी पेन्शन योजना (EPS) मध्ये जमा केले जातात.
नॉमिनीचे नाव पीएफ खात्यात नसेल तर यातही अडचण येते. (EPFO e Nomination Change Online)

3 – एम्प्लॉई डिपॉझिट लिंक्ड इन्श्युरन्स स्कीम (EDLI) म्हणतात.
या योजनेत, नामांकित व्यक्तीला कमाल 7 लाख रुपयांचे विमा संरक्षण दिले जाते.
अशा स्थितीत जे कर्मचारी खाजगी क्षेत्रात काम करतात. त्यांना 7 लाख रुपयांपर्यंतचे मोफत विमा संरक्षण मिळते.

 

असे अपडेट करू शकता नॉमिनीचे नाव –
ईपीएफओच्या म्हणण्यानुसार, ईपीएफओ पोर्टलवर सदस्याने नवीन नॉमिनीचे नाव अपडेट करताच जुन्या नॉमिनीचे नाव काढून टाकले जाईल.
यानंतर खात्याच्या सर्व सेवांवर त्या नवीन नॉमिनीवर अधिकार असेल.

 

नॉमिनी असा अपडेट करू शकतात

EPFO ची अधिकृत वेबसाइट http://www.epfindia.gov.in वर लॉग इन करा.

’सर्व्हिस’ वर जा आणि ड्रॉप डाउन मेनूमधून फॉर एम्प्लॉई ऑपशन टॅप करा.

त्यानंतर, ’सदस्य यूएएन/ऑनलाइन सेवा वर टॅप करा.

त्यानंतर यूएएन आणि पासवर्डने लॉग इन करा.

आता ’मॅनेज’ टॅबखाली ’ई – नॉमिनेशन’ पर्यायावर क्लिक करा.

कुटुंबाची घोषणा आणि ‘कौटुंबिक तपशील नोंदवा’ किंवा नॉमिनीची माहिती अपडेट करण्यासाठी ‘येस’ वर क्लिक करा.
येथे नॉमिनीसाठी मागीतलेली सर्व माहिती द्या.

जर तुम्हाला एकापेक्षा जास्त नॉमिनी नोंदवायचे असतील तर ’Add New Button’ वर टॅप करा आणि इतर नॉमिनीचे तपशील द्या.

कुटुंब तपशील सेव्ह केल्यावर, तुमची ई – नामांकन प्रक्रिया पूर्ण होईल.

 

Web Title :- EPFO e Nomination Change Online | epfo want to change e nominee in eps and pf account follow these easy steps

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा 

 

 

 

Back to top button