EPFO e-Nomination | EPFO ने वाढवली ई-नॉमिनेशन सबमिट करण्याची शेवटची तारीख, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – EPFO e-Nomination | 31 डिसेंबरनंतरही ईपीएफओचे सदस्य त्यांचे ई-नॉमिनेशन (EPFO e-Nomination) दाखल करू शकतात. सेवानिवृत्ती निधी संस्था कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) ने आपल्या खातेदारांना ई-नॉमिनेशन करण्याचा सल्ला दिला आहे. EPFO ने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून सदस्यांसाठी एक ट्विट देखील केले आहे. ईपीएफओने आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, “तुम्ही तुमचे ई-नॉमिनेशन 31 डिसेंबरनंतरही दाखल करू शकता. परंतु तुम्ही आजच तुमचे ई-नॉमिनेशन दाखल करावे. ई-नॉमिनेशन दाखल करण्यासाठी आता अंतिम मुदत नाही. नॉमिनेशन द्वारा सामाजिक सुरक्षा लाभ जसे की पेन्शन आणि EDLI सारख्या सुविधा प्राप्त करू शकता.

 

पेन्शन सुविधेचे व्यवस्थापन करणारी ईपीएफओ (employee provident fund organisation) आपल्या सदस्यांना वेबसाईटद्वारे अकाउंट नॉमिनेशन ची माहिती ऑनलाइन सबमिट करण्याची परवानगी देते. सदस्याचा मृत्यू किंवा इतर अपघाती घटनांसारख्या त्रास टाळण्यासाठी अकाउंट नॉमिनी करणे आवश्यक आहे.

ई-नॉमिनेशन करण्याच्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस.
ऑनलाइन माध्यमातून ई-नॉमिनेशन करण्यासाठी, प्रथम तुम्हाला EPFO च्या अधिकृत वेबसाइट www.epfindia.gov.in वर जावे लागेल व तुम्हाला तुमचा UAN नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन करावे लागेल. यानंतर, तुम्हाला मॅनेजचा पर्याय निवडून ई-नॉमिनेशनचा पर्याय निवडावा लागेल. आता तुमच्या समोर एक पेज उघडेल, जिथे UAN नंबर, नाव आणि जन्मतारीख यासारखी सदस्याची संपूर्ण माहिती दाखवली जाईल. या प्रक्रियेनंतर, तुम्हाला तुमची वर्तमान आणि कायमची माहिती टाकावी करावी लागेल आणि सेव्ह वर क्लिक करावे लागेल. (EPFO e-Nomination)

 

आता तुम्हाला फॅमिली डिक्लेरेशन अपडेट करण्यासाठी येसच्या ऑप्शनवर क्लिक करून अ‍ॅड फॅमिली या पर्यायावर जावे लागेल. तेथे तुम्हाला नॉमिनीचे नाव, जन्मतारीख, नातेसंबंध, पत्ता आणि आधार क्रमांक टाकावा लागेल. यानंतर, नॉमिनेशन डिटेल्सवर जाऊन, तुम्ही ठरवू शकता की कोणत्या नॉमिनीला किती हिस्सा द्यायचा आहे. यानंतर तुम्हाला सेव्ह नॉमिनेशन या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

 

या स्टेपनंतर तुम्हाला एक OTP जनरेट करावा लागेल, त्यासाठी तुम्हाला E-Sign च्या टॅबवर क्लिक करावे लागेल.
यानंतर तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एक OTP मिळेल.
तुम्‍ही ई-नॉमिनेशन सबमिट करताच EPFO कडे नोंदणी केली जाईल.

 

 

Web Title :- EPFO e-Nomination | epfo extends last date for filing e nomination know step by step process

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Kirit Somaiya | विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुन सोमय्यांचा खळबळजनक दावा; म्हणाले – ‘पवार आणि ठाकरेंनी राहुल गांधींचं पपलू केलं’

New Year Celebration | नवीन वर्षाच्या उत्सवात भान हरवू नका ! ‘या’ चुकांमुळे तुमच्या घरात येऊ शकतो कोरोना व्हायरस

MP Vinayak Raut | विनायक राऊतांचा घणाघात; म्हणाले – ‘नारायण राणेंचा नरबळी देण्याचा प्रयत्न फसला’