EPFO | पीएफ खातेधारकांसाठी खुशखबर ! अप्लाय केल्यानंतर फक्त ‘इतक्या’ दिवसात मिळतेय रक्कम, जाणून घ्या
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – EPFO | जर तुम्हाला पैशांची आवश्यकता असेल तर तुम्ही सहज तुमच्या पीएफचे पैसे काढू शकता, यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही. पीएफची रक्कम काढण्यासाठी काही नियमांचे पालन (EPFO) करावे लागते.
– कशी काढावी पीएफची रक्कम
पीएफमधून पैसे काढण्यासाठी किती वेळ लागेल, हे त्यावर ठरते की तुम्ही कशाप्रकारे आपली रक्कम काढत आहात. कोविड संकटात सुद्धा अनेक स्थितींचा पीएफ विड्रॉलमध्ये समावेश केला आहे म्हणजे सामान्य नियमांशिवाय आता कोविडसंबंधीत स्थितीत सुद्धा पैसे काढता येऊ शकतात.
पीएफचे पैसे क्रेडिट होण्यास वेळ लागतो. सामान्यपणे कोणत्याही गंभीर आजाराच्या उपचारासाठी, लग्न किंवा शिक्षणासाठी, प्लॉट खरेदीसाठी, घर बांधण्यासाठी, रिटायर्मेंटच्या वेळी, वैद्यकीय गरजांच्या वेळी पैसे काढता येतात. कोविड संकटात उपचारासाठी पैसे घेणे, नोकरी सुटल्यानंतर पैसे काढणे यांचा समावेश आहे.
ज्या लोकांनी कोरोना व्हायरसच्या पहिल्या लाटेत कोविड अॅडव्हान्स घेतले होते, ते लोक दुसर्या लाटेत सुद्धा अॅडव्हान्स घेऊ शकतात.
कोरोनाशिवाय इतर सामान्य परिस्थितीत पीएफ फंड विड्रॉलसाठी अप्लाय केले तर फंड तुमच्या खात्यात 20 दिवसात ट्रान्सफर होतो.
तर, कोविडसंबंधी परिस्थितीत विड्रॉलसाठी अप्लाय केल्यास फंड लवकर रिलिज केला जातो.
कोविड काळात पीएफ विड्रॉलचे पैसे 7 दिवसात येतात आणि जर मेडिकल इमर्जन्सी असेल तर 3 दिवसात पैसे मिळतात.
Web Title : EPFO | epfo account account holders enjoy account after account
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update