EPFO ने 23.44 कोटी लोकांच्या अकाऊंटमध्ये जमा केलं 8.5 टक्के व्याज, घरबसल्या जाणून घ्या कसा तपासू शकता PF Balance?
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) आर्थिक वर्ष 2020-21 साठी 23 कोटीपेक्षा जास्त सबस्क्रायबर्सच्या खात्यात 8.50 टक्के दराने व्याज (PF Interest) जमा केले आहे. EPFO ने अधिकृत ट्विटर हँडलवर सांगितले की, आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये आतापर्यंत 23.44 कोटी लोकांच्या खात्यात 8.50 टक्के दराने पैसे ट्रान्सफर करण्यात आले आहेत. तुमच्या पीएफ खात्यात पैसे आले किंवा नाही हे जाणून घ्यायचे असेल तर ताबडतोब या पद्धतीने आपला पीएफ अकाऊंट बॅलन्स (How to Check PF Account Balance) तपासू शकता.
SMS द्वारे चेक करू शकता बॅलन्स
तुम्ही एसएमएसने सुद्धा आपला पीएफ अकाऊंटचा बॅलन्स सहज जाणून घेवू शकता. यासाठी तुम्हाला तुमचा युएएन माहित असायला हवा. सोबतच तो अॅक्टिव्ह असावा. एसएमएस सर्वप्रथम EPFOHO UAN HIN टाइप करून 7738299899 वर पाठवावा लागेल. ज्यानंतर तुम्हाला हिंदीमध्ये मेसेज येईल. ज्यामध्ये तुमच्या पीएफ अकाऊंटमध्ये जमा रक्कमेची पूर्ण माहिती असेल.
मिस्ड कॉलद्वारे चेक करा पीएफ बॅलन्स
तुम्ही तुमच्या PF Account चा बॅलन्स एका मिस्ड कॉलने जाणून घेऊ शकता. यासाठी आपल्या अकाऊंटमध्ये रजिस्टर्ड मोबाइल नंबरवरून 011-22901046 वर एक मिस्ड कॉल द्यावा लागेल. ज्यानंतर तुम्हाला ईपीएफओकडून एक एसएमएस येईल. ज्यामध्ये तुम्हाला आपल्या पीएफ अकाऊंटमध्ये जमा रक्कमेची संपूर्ण माहिती मिळेल. (EPFO)
EPFO वेबसाइटवर चेक करा पीएफ बॅलन्स
यासाठी https://passbook.epfindia.gov.in/MemberPassBook/Login वर लॉग-इन करा. आता युएएन आणि पासवर्ड द्वारे लॉग-इन करून पासबुक चेक करू शकता.
UMANG App द्वारे असा चेक करा
प्ले स्टोर वरून उमंग अॅप डाऊनलोड करा. या अॅपवर अनेक सरकारी सेवा उपलब्ध आहेत.
यामध्ये ईपीएफओ ऑपशन निवडल्यानंतर एम्प्लॉई सेंट्रीक सर्व्हीस निवडा. आता युएएन नंबर टाका.
यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी प्राप्त होईल. तुम्ही व्ह्यू पासबूक अंतर्गत ईपीएफ बॅलन्स चेक करू शकता.
Web Title :- EPFO | epfo credited 8 50 percent pf interest in 23 44 crore accounts for fy 2021 know how to check pf balance details
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Ananya Panday | पूर्ण पॅन्ट घालायला विसरली अनन्या पांडे, जाळीदार कपड्यांमध्ये भागवलं ‘काम’ !
Sanjay Raut | दिल्लीत FIR दाखल झाल्यानंतर संजय राऊत यांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…