×
Homeआर्थिकEPFO | पीएफधारकांसाठी महत्वाची माहिती ! नोकरी सोडली आहे? तर मग हे...

EPFO | पीएफधारकांसाठी महत्वाची माहिती ! नोकरी सोडली आहे? तर मग हे जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – EPFO | पीएफधारकांसाठी (PF Holders) ही एक महत्वाची माहिती (EPFO) आहे. अनेकजण चांगल्या पगाराच्या नोकरीवर असतात. त्यानंतर त्याहून चांगली नोकरी लागल्याने ते पहिली नोकरी सोडतात. नोकरी सोडताना संबंधित कर्मचाऱ्याला सर्व औपाचारिकता पूर्ण केल्यावर कंपनीतून बाहेर जाता येते. दरम्यान, नोकरी सोडत असताना अनेकजण पीएफ खात्यामध्ये (PF Accounts) डेट ऑफ एक्झिट (Date Of Exit) टाकून घेत नाहीत. हे काम कंपनीचं (Company) असतं. हे काम न झाल्याने नंतर जुन्या कंपनीत हेलपाटे मारावे लागतात अथवा संबंधित व्यक्तीला फोन करुन हे काम करण्यास प्रयत्न करावा लागतो. याबाबत जाणून घ्या.

 

पीएफधारकांसाठी (PF Holders) महत्वाची माहिती म्हणजे आता डेट ऑफ एक्झिटची (Date Of Exit) तारीख ही स्वत: तो कर्मचारी देखील टाकू शकणार आहे. त्याचबरोबर पुर्वीच्या पीएफ खात्यातील रक्कम नवीन खात्यात ऑनलाईन कशी वळती करुन घ्यायची आहे. हे देखील सविस्तर जाणून घ्या. (EPFO)

 

दरम्यान, डेट ऑफ एक्झिट (Date Of Exit) भरण्याची ही सुविधा खूप मस्त आहे. मात्र. तुम्ही हे काम जुन्या कंपनीने दोन महिन्याची PF रक्कम खात्यात जमा केल्यानंतर करु शकणार आहे. यानंतरच PF काढता येईल अथवा नवीन PF खात्यात (PF Accounts) ट्रान्सफर करता येणार आहे. यासोबतच मोबाईल नंबर तुमच्या आधार क्रमांकाशी (Aadhaar number) लिंक असेल, तरच तुम्हाला OTP मिळणार आहे .

 

असं करा सबमिट (Date Of Exit) –

https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ या वेबसाईटवर जावा.

UAN आणि Password टाकून लॉगीन करा.

Manage’ या टॅबवर क्लिक करा. इथे तुम्हाला सर्वात शेवटी ‘Mark Exit’ हा पर्याय दिसणार आहे. या पर्यायावर क्लिक करा.

यानंतर नोकरी सोडलेल्या ठिकाणचा PF नंबर निवडा, ज्यात तुम्हाला ‘Date of Exit’ टाकायची आहे.
तारीख टाकल्यानंतर कारण निवडा. त्यानंतर ‘Request OTP’ वर क्लिक करा.

आधारसोबत (Aadhaar card) लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर तुम्हाला एक ओटीपी मिळेल.
मिळालेला ओटीपी रकान्यात भरा आणि सबमिट करा. यानंतर तुमचा फॉर्म सबमिट होईल.

 

Web Title :-  EPFO | epfo date of exit can be filled by yourself after changing company know step by step process

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

 

 

 

Must Read
Related News