EPFO ने गुंतवणूक पर्याय म्हणून InvIT ला दिली मंजूरी, PF च्या पैशांचा सरकार करणार ‘या’ साठी वापर; मिळेल जास्त व्याज!

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – EPFO | रिटायर्मेंट फंड बॉडी ईपीएफओ (EPFO) ने शनिवारी म्हटले की, त्यांनी इनव्हिट (InvIT) सारख्या नवीन असेट क्लासमध्ये गुंतवणुकीवर निर्णय घेण्यासाठी आपली अ‍ॅडव्हायजरी बॉडी फायनान्स इन्व्हेस्टमेंट अँड ऑडिट कमिटी म्हणजे एफआयएसीला (FIAC) सक्षम बनवले आहे.

 

सध्या भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरण (NHAI) आणि पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन (PGCIL) ने सार्वजनिक क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या इन्व्हेस्टमेंट (InvITs) ची ऑफर दिली आहे. ईपीएफओ पब्लिक सेक्टरच्या बाँडमध्ये सुद्धा गुंतवणूक करेल. केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांच्या अध्यक्षतेखाली EPFO चे निर्णय घेणारी प्रमुख संस्था – सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीज (CBT) च्या 229व्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

 

नवीन सरकारी इन्स्ट्रूमेंटमध्ये गुंतवणूक

EPFO खासगी क्षेत्रातील इनव्हिट मध्ये गुंतवणूक करणार का, असे विचारल्यावर, बैठकीनंतर यादव यांनी म्हटले की, सध्या आम्ही केवळ नवीन सरकारी इन्स्ट्रूमेंट (बाँड आणि इनव्हिट) मध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी कोणतीही टक्केवारी नाही. हे एफआयएसी द्वारे केस टू केस बेसिसवर ठरवले जाईल.

 

एका अधिकृत वक्तव्यात म्हटले आहे की, बोर्डाने एफआयएसीला केस टू केस बेसिसवर गुंतवणूक पर्यायावर निर्णय घेण्यासाठी सशक्त बनवण्याचा निर्णय घेतला.

 

या निर्णयाबाबत समजावताना कामगार सचिव सुनील बर्थवाल यांनी म्हटले की,
जर आम्हाला उच्च व्याजदर द्यायचा असेल तर आम्हाला अर्थ मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे लागेल.
काही इन्स्ट्रूमेंट आहेत, जिथे आम्ही विविध कारणामुळे गुंतवणूक करण्यास सक्षम नव्हतो. परंतु, आता आम्ही त्या इन्स्ट्रूमेंटमध्ये करू शकतो.

 

Web Title :- EPFO | epfo empowers advisory body fiac to take call on investment in new instruments like invits marathi news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Prakash Ambedkar | NCB चे अधिकारी वानखेडे हिंदू की मुस्लिम? प्रकाश आंबेडकरांचे महत्त्वाचे विधान, वाचून दाखवला SC चा निकाल

Sooryavanshi Movie | अक्षय कुमारच्या ‘सूर्यवंशी’वर भडकली अंडरवर्ल्ड ‘डॉन’ दाऊद इब्राहिमची गर्लफ्रेंड, म्हणाली…

Provident Fund Account | मार्च महिन्यात निवृत झाले आणि एप्रिलमध्ये PF काढला, तर एप्रिलचे व्याज मिळेल का? जाणून घ्या

Puneet Balan Group | पहिल्या ‘पुनित बालन करंडक’ अजिंक्यपद 14 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेचे 23 नोव्हेंबर पासून आयोजन

Vitamin Deficiency | ‘या’ Vitamin च्या कमतरतेमुळे वाढतो हृदयाचा धोका ! हाडे होतात कमजोर, ‘हे’ खाल्ले तर मिळेल जबरदस्त फायदा

Kareena Kapoor | अनुष्का-विराट नंतर करीना कपूर आणि सैफने घेतला ‘हा’ मोठा निर्णय