EPFO ने कर्मचार्‍याच्या मृत्यूनंतर मिळणारी रक्कम केली दुप्पट; जाणून घ्या आता किती मिळेल फंड

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  EPFO ने आपले कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना मोठा दिलासा दिला आहे. सेंट्रल बोर्डाने त्यांची Ex-gratia Death Relief Fund ची रक्कम दुप्पट केली आहे. यामुळे कर्मचार्‍यांच्या कुटुंबियांना मोठी मदत होणार आहे. बोर्डाने हा आदेश तात्काळ प्रभावाने लागू केला (EPFO) आहे.

 

Addl. Central PF Commissioner (HRM) उमा मंडल यांच्यानुसार, जर एखाद्या कर्मचार्‍याचा Non Covid मृत्यू म्हणजे नैसर्गिक मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला
Ex-gratia Death Relief Fund दुप्पट मिळेल.
ही रक्कम बोर्डाच्या प्रत्येक कर्मचार्‍यासाठी समान आहे. या रक्कमेसाठी Welfare fund मध्ये व्यवस्था करण्यात आली आहे.

 

उमा मंडल यांच्यानुसार Ex-gratia Death Relief Fund ची रक्कम 4.20 लाख रुपयावरून वाढवून 8 लाख रुपये करण्यात आली आहे.
ही रक्कम Central Provident Fund Commissioner/ President, Central Staff Welfare Committee आणि Employees’ Provident Fund मधून मंजूरी घेऊन वाढवली आहे.
आता कर्मचार्‍याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबातील सदस्य किंवा नॉमिनीला ही Ex-gratia Death Relief Fund मधून रक्कम दिली जाईल.

 

उमा मंडल यांच्यानुसार जर सेंट्रल बोर्डाच्या एखाद्या कर्मचार्‍याचा मृत्यू Covid मुळे झाला तर याबाबतीत 28 एप्रिल 2020 चा आदेश मानला जाईल.
बोर्डाने हा आदेश Regional Staff Welfare Committees च्या सर्व प्रमुखांना जारी केला आहे. सोबतच तो तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आला आहे. (EPFO)

 

Web Title : EPFO | epfo great news enhancement of ex gratia death relief fund of rupee eight lakhs in the event of death of an employee of the central board due to non covid 19 normal death

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Medicine Price Hike | रुग्णांना बसणार महागाईची झळ, औषधांच्या किंमती सुमारे 40 टक्क्यांनी महागल्या

Indian Railways | राज्यातील मुखेड, नांदेड, पुर्णा, वसमत, हिंगोली, वाशिम, अकोला आणि मलकापुरमधून धावणार ‘ही’ नवी सुपरफास्ट रेल्वे 

ST Workers Agitation | पुणे जिल्ह्यात 26 एसटी कर्मचारी निलंबित; राज्यात 918 Suspended