×
Homeआर्थिकEPFO | 'या' तारखेला येतील PF वरील व्याजाचे पैसे, मोदी सरकार करणार...

EPFO | ‘या’ तारखेला येतील PF वरील व्याजाचे पैसे, मोदी सरकार करणार खात्यात ट्रान्सफर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) ने PF वर व्याजदर निश्चित केला आहे. आता पीएफच्या व्याजाचे पैसे लवकरच खात्यात जमा होतील, अशी अपेक्षा कर्मचार्‍यांना आहे. सूत्रांनुसार, सरकार (Modi Government) 30 जूनपर्यंत पीएफचे पैसे ट्रान्सफर करू शकते. म्हणजेच या महिन्याच्या अखेरीस पीएफवरील व्याजाचे पैसे ट्रान्सफर केले जातील. (EPFO)

 

मात्र, यावर सरकार किंवा EPFO कडून कोणतेही वक्तव्य आलेले नाही. गतवर्षी पाहिल्यास, सरकारने गेल्या वर्षी दिवाळीच्या आसपास व्याजाचे पैसे हस्तांतरित करण्यास सुरुवात केली होती.

 

पीएफचे पैसे 30 जून रोजी येऊ शकतात, पीएफचे व्याज ठरलेले असल्याने, बहुतेक नोकरदारांना पीएफचे व्याज लवकरात लवकर त्यांच्या खात्यात येईल अशी अपेक्षा आहे. मीडियामध्ये येणार्‍या बातम्यांवर विश्वास ठेवला तर EPFO जून अखेरपर्यंत म्हणजेच 30 जूनपर्यंत पीएफ खात्यात पीएफवरील व्याज (Interest On PF Account) टाकू शकते.

मात्र, याबाबत सरकारकडून अद्याप कोणतेही वक्तव्य आलेले नाही. ईपीएफओने ठरवलेल्या व्याजदराला अर्थ मंत्रालयाकडून अद्याप मंजुरी मिळालेली नाही.

 

गेल्या 10 वर्षातील सर्वात कमी व्याज यावेळी जाहीर केल्याने नोकरदारांना सरकारकडून हा मोठा धक्का आहे कारण हे व्याज गेल्या 40 वर्षातील सर्वात कमी आहे. EPFO ने 2021 – 2022 या आर्थिक वर्षासाठी 8.1% व्याजदर निश्चित केला आहे, जो गेल्या 10 वर्षातील सर्वात कमी व्याजदर आहे.

 

सरकारच्या या निर्णयामुळे ईपीएफओच्या सुमारे 6 कोटी लोकांना धक्का बसला आहे. गेल्या आर्थिक वर्षात पीएफवर 8.5 टक्के व्याज मिळत होते.

 

यापूर्वी किती मिळाले होते व्याज ?
EPFO ने 2019 – 2020 या आर्थिक वर्षात 8.5% व्याज दिले होते.
त्यानंतर 2020 – 2021 या आर्थिक वर्षातही केवळ 8.5% व्याज मिळाले.
तर 2018 – 19 मध्ये 8.65% व्याज दिले होते. 2017 – 18 या आर्थिक वर्षात 8.55% व्याज मिळाले.

 

Web Title :- EPFO | epfo interest on pf may come on 30 june finance ministry provident fund interest on pf

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

 

 

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News