EPFO | ‘हे’ कागदपत्र जमा केले नाही तर पुढील महिन्यापासून PF ‘कटिंग’ होईल बंद, ‘या’ पध्दतीनं टाळा असुविधा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  EPFO | कर्मचारी भविष्य निर्वाह निधी किंवा EPF अंतर्गत कर्मचार्‍यांना PF चा लाभ दिला जातो. या अंतर्गत पीएफचे पैसे तुमच्या पगारातून कापले जाऊन त्यावर योग्य व्याज दिले जाते, निवृत्तीनंतर हाच निधी जगण्यासाठी आधार देतो. यासाठी ईपीएफ कोणत्याही कॉर्पोरेट कंपनीच्या कर्मचार्‍यांच्या जीवनाचा एक महत्वाची बाजू असतो. (EPFO)

 

कर्मचारी भविष्य निर्वाह निधीकडून आदेश जारी करण्यात आला आहे की, आधार कार्ड आपल्या ईपीएफओद्वारे जारी युनिव्हर्सल अकाऊंट नंबरसोबत जोडणे महत्वाचे आहे आणि ते सुद्धा 30 नोव्हेंबरपूर्वी हे काम झाले पाहिजे. अन्यथा तुमचा पीएफ कापला जाणे बंद होईल.

 

UAN नंबर युनिव्हर्सल अकाऊंट नंबर प्रत्येक ईपीएफ सदस्याला दिला जातो.
याच्या मदतीने ईपीएफ कर्मचारी आपला पीएफ तपासू शकतात.
सोबतच ईपीएफसंबंधी इतर माहिती आणि सूचना मिळवू शकतात.

 

EPFO ने UAN आधार नंबरसोबत लिंक करण्याची मर्यादा वाढवली आहे. कालावधी 30 नोव्हेंबर, 2021 पर्यंत करण्यात आला आहे.
तर अगोदर ही तारीख 31 ऑगस्ट 2021 होती.

 

आधार लिंक नसेल तर काय होईल

 

Aadhaar आणि UAN लिंकिंग जर 1 डिसेंबरपूर्वी केले नाही तर ईपीएफओ मेंबर्सचे मोठे नुकसान होऊ शकते.
जर एखाद्या कर्मचार्‍याचे पीएफ अकाऊंट आधारसोबत लिंक केले नसेल तर त्याचे पीएफचे पैसे जमा होणार नाहीत आणि कर्मचारी आपल्या पीएफ खात्यातून पैसे काढू शकणार नाहीत.
पीएफ खात्यावर मिळणार्‍या इन्श्युरन्स कव्हरसाठी आधार-यूएएन आपसात लिंक असणे आवश्यक आहे.

 

आधारसोबत ईपीएफ अकाऊंट असे करा लिंक

 

सर्वप्रथम https://unifiedportal mem.epfindia.gov.in/memberinterface/ लिंकवर क्लिक करा.

आता UAN आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा.

यानंतर Manage सेक्शनमध्ये KYC Option सिलेक्ट करा.

अकाऊंटसोबत आधारला लिंक करण्याचे अनेक डॉक्युमेंट्स दिसतील.

आधार ऑपशनवर क्लिक करा, आधार नंबर आणि नाव टाईप करून Service वर क्लिक करा.

यानंतर माहिती सुरक्षित होईल आणि आधार UIDAI सोबत डाटा व्हेरीफाय होईल.

KYC कागदपत्र योग्य असल्यास आधार EPF अकाऊंटसोबत लिंक होईल. Verify लिहून येईल.

 

Web Title : EPFO | epfo latest update news if this document is not submitted then pf will be stopped from next month

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Best Pension Plan Retirement Scheme | दरमहा मिळेल 9 लाख रुपयांची पेन्शन ! तात्काळ सुरू करा गुंतवणूक, जाणून घ्या ‘प्लान’

Solapur Crime | माढा तालुक्यात टेंभुर्णी पुलाशेजारी ट्रक-टॅंकरचा भीषण अपघात; 5 जणांचा जागीच मृत्यू तर 6 जखमी

Pune Navale Bridge Accident | पुण्यातील नवले पुलाजवळ पुन्हा अपघात, तीन ट्रक एकमेकांना धडकले