
EPFO | 22.55 कोटी खातेधारकांच्या खात्यात पाठवले व्याजाचे पैसे, ताबडतोब असे तपासा तुम्हाला मिळाले किंवा नाही ?
EPFO | epfo news interest money sent to the account of 22 55 crore account holders check balance by this process
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – EPFO | नवीन वर्षात कर्मचारी भविष्य निर्वाह निधीने कर्मचार्यांना आनंदाची बातमी दिली आहे. ज्या कर्मचार्यांच्या खात्यावर अद्याप व्याजाची रक्कम पाठवण्यात आली नाही, अशा कर्मचार्यांना व्याजाची रक्कम पाठवण्यात आली आहे. याचा फायदा सुमारे 6 कोटी कर्मचार्यांना झाला आहे. (EPFO)
2021-22 या आर्थिक वर्षासाठी, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) ने 22.55 कोटी पीएफ खातेदारांच्या खात्यांवर 8.50 टक्के दराने व्याज जारी केले आहे. जर पैसे तुमच्या खात्यात पोहोचले नाहीत किंवा तुम्हाला तुमची शिल्लक तपासायची असेल, तर येथे स्टेप बाय स्टेप प्रोसेस सांगण्यात आली आहे.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना पगारदार लोकांच्या पगारातून काही टक्के कपात करते. जी निवृत्तीच्या वेळी किंवा गरजेच्या वेळी कामी येते. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना कर्मचार्यांना या रकमेवर व्याज देते. 2021-22 च्या हंगामात कर्मचार्यांच्या खात्यात व्याजाचे पैसे जारी करण्यात आले आहेत. बॅलन्स कसा तपासायचा ते जाणून घेवूयात…
1. मिस्ड कॉलने तपासा बॅलन्स
जर तुम्ही पीएफ खातेधारक असाल आणि तुमचा मोबाईल नंबर तुमच्या पीएफ खात्याशी जोडलेला असेल, तर तुम्ही UAN क्रमांकाशिवायही तुमच्या पीएफ खात्यातील बॅलन्स तपासू शकता.
यासाठी, EPFO खातेधारक 011-22901406 या क्रमांकावर मिस्ड कॉल करू शकतात, परंतु मिस्ड कॉल त्याच नंबरवरून केला पाहिजे जो खात्याशी लिंक आहे. तुमचा UAN नंबर आणि PF खात्यातील बॅलन्स तुमच्या नोंदणीकृत नंबरवरून या नंबरवर मिस कॉल केल्यानंतर थोड्याच वेळात पाठवला जाईल.
2. एसएमएस तपासा बॅलन्स
कोणताही पीएफ खातेधारक ईपीएफओच्या एसएमएस सुविधेद्वारे त्याच्या पीएफ खात्यातील शिल्लक तपासू शकतो. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला 77382-99899 या क्रमांकावर EPFOHO UAN एसएमएस करावा लागेल. तुमचा UAN नंबर आणि PF खात्यातील बॅलन्सची माहिती एसएमएस नंतर लवकरच तुमच्या नंबरवर पाठवली जाईल.
3. ऑनलाइन देखील तपासू शकता पैसे
EPFO धारक https://passbook.epfindia.gov.in/MemberPassBook/Login वेबसाइटला भेट देऊन त्यांचा बॅलन्स तपासू शकतात.
येथे तुम्हाला ई-पासबुक मिळेल, जे तुम्ही डाउनलोड करू शकता आणि तुमच्या ट्रांजक्शनची पूर्ण हिस्ट्री जाणून घेऊ शकता.
Web Title : EPFO | epfo news interest money sent to the account of 22 55 crore account holders check balance by this process
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Google Pay-Paytm-ATM | गुगल पे आणि पेटीएमचा वापर करून ATM मधून काढून शकता पैसे,
केवळ क्यूआर कोड (QR Coad) करावा लागेल स्कॅन
Intermittent Fasting | काय असतं इंटरमिटेंट फास्टिंग? जाणून घ्या वजन कमी करायची जबरदस्त पद्धत
Sore Throat Problems | सर्दीपासून घसादुखीपर्यंत, गरम पाण्याचे सेवन हा एक प्रभावी घरगुती उपाय