EPFO | तुमच्या PF खात्यात किती पैसे टाकणार सरकार, जाणून घ्या हिशेब

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – EPFO | सरकार लवकरच भविष्य निर्वाह निधी (PF) खातेधारकांच्या खात्यात पैसे टाकू शकते. पीएफ खातेधारक त्यांच्या खात्यात जमा झालेल्या पैशांवर व्याज मिळण्याची वाट पाहत आहेत. सरकारने पीएफमध्ये जमा केलेल्या रकमेवर व्याजदर (PF Interest Rate) निश्चित केला आहे. पीएफ खातेधारकांना त्यांच्या ठेवींवर 8.1 टक्के दराने व्याज मिळेल. मात्र, व्याजाची रक्कम कधी ट्रान्सफर केली जाईल याबद्दल सरकार किंवा EPFO कडून कोणतीही माहिती समोर आलेली नाही. (EPFO)
किती पैसे येतील?
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत (EPFO) जमा रकमेवर सरकारने व्याजदरावर शिक्कामोर्तब केले आहे. 2021-22 या आर्थिक वर्षासाठी EPF वर 8.1 व्याजदर निश्चित करण्यात आला आहे. वृत्तानुसार सरकार या महिन्यात पीएफ खात्यात जमा रकमेवर व्याजाची रक्कम जमा करू शकते.
आता कोणत्याही पीएफ खातेदाराच्या खात्यात किती व्याज येईल, ते त्याच्या खात्यात जमा केलेल्या रकमेवर अवलंबून असेल. सरकार जमा केलेल्या रकमेवर 8.1 टक्के दराने व्याजाची रक्कम ट्रान्सफर करेल. समजा तुमच्या पीएफ खात्यात एक लाख रुपये जमा असतील तर 8.1 टक्के दराने तुम्हाला वार्षिक 8,100 रुपये व्याज मिळेल. (EPFO)
कुठे गुंतवले जातात पीएफचे पैसे?
EPFO अनेक ठिकाणी पीएफ खातेदाराच्या खात्यात जमा केलेली रक्कम गुंतवते. या गुंतवणुकीतून मिळणार्या कमाईचा एक भाग खातेदारांना व्याजाच्या स्वरूपात दिला जातो. सध्या, EPFO 85 टक्के भाग डेट (Debt) ऑप्शनमध्ये गुंतवते. यामध्ये सरकारी सिक्युरिटी (Govt Securities) आणि बाँड (Bond) चाही समावेश आहे. उर्वरित 15 टक्के रक्कम ईटीएफ (ETF) मध्ये गुंतवली जाते. डेट आणि इक्विटीच्या कमाईच्या आधारावर पीएफचे व्याज ठरवले जाते.
असा जाणून घ्या पीएफ बॅलन्स
– ईपीएफओच्या वेबसाइटवर जा.
– ’अवर सर्व्हिसेस’ (Our Services) च्या ड्रॉपडाउनमधून ’फॉर इम्प्लॉईज’ (For Employees) पर्याय निवडा.
– यानंतर मेंबर पासबुक (Member Passbook) वर क्लिक करा.
– आता यूएएन नंबर (UAN Number) आणि पासवर्ड (Password) च्या मदतीने लॉगिन करा.
– पीएफ खाते (PF Account) निवडा आणि ते उघडताच तुम्हाला शिल्लक दिसेल.
– एसएमएस (SMS) द्वारे शिल्लक तपासण्यासाठी, ’EPFOHO UAN ENG’ टाइप करून 7738299899 वर मेसेज पाठवा. तुम्हाला प्रत्युत्तरात शिल्लक माहिती मिळेल.
– याशिवाय उमंग अॅप (Umang App) वरूनही पीएफ शिल्लक (PF Balance) तपासता येईल.
Web Title :- EPFO | epfo pf account holders get interest money soon know the details and how to check balance
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Ghulam Nabi Azad | गुलाम नबी आझाद नव्या पक्षाची स्थापना करणार?